Delhi Vidhan Sabha Election : काँग्रेस-आप वेगळी चूल मांडणार

101
हरियाणामध्ये Indi Alliance फुटली

लोकसभा निवडणूक इंडी आघाडी मध्ये एकत्र लढलेल्या दोन पक्षात फूट पडण्याची शक्यता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात दबक्या आवजात ऐकू येत आहे. यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस आणि आप पुन्हा एकदा विरोधात उभे राहणार असल्याची शक्यता बळावली आहे. (Delhi Vidhan Sabha Election)

कारण लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये काँग्रेससोबत निवडणूक लढूनही आम आदमी पक्षाला (AAP) एकही जागा जिंकता आली नाही. लोकसभेच्या सातही जागांवर भाजपाने विजय मिळवला. त्यामुळे पुढील वर्षी होणारी दिल्ली विधानसभेची निवडणुक काँग्रेसची साथ सोडून स्वबळावर लढणार असल्याच्या हालचाली ‘आप’मध्ये सुरु झाल्या आहेत. (Delhi Vidhan Sabha Election)

(हेही वाचा – कोणताही खेळाडू शासकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची काळजी घेणार; Ajit Pawar यांचे आश्वासन)

सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न

इंडी आघाडीत आप आणि काँग्रेस एकत्र आहेत. मात्र, दिल्लीमध्ये एकत्र लढणाऱ्या आप आणि काँग्रेसने पंजाबमध्ये एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढली. तेथे १३ पैकी सात जागा काँग्रेसने जिंकल्या तर आपला केवळ तीन जागा मिळाल्या. दिल्ली सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी देखील विधानसभा निवडणूक आप स्वबळावर लढणारे असल्याचे सांगितले होते. (Delhi Vidhan Sabha Election)

इंडी आघाडीत असताना ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणूक स्वबळावर लढली. तेथे त्यांना चांगले यश मिळाले. त्याच प्रमाणे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी आप करत आहे. दिल्लीमध्ये २०२० च्या विधानसभा निवडणुकीत आपला ७० पैकी ६२ जागा मिळाल्या होत्या. तर, भाजपाला केवळ आठ जागा मिळाल्या होत्या. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मद्यधोरण आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरुंगात आहेत. तुरुंगात असूनही त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नाही. केजरीवाल हे तुरुंगात असल्याने त्यांच्या विषयी निर्माण होणाऱ्या सहानुभूतीचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत फायदा ‘आप’ला मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Delhi Vidhan Sabha Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.