रशियाची (Russia) राजधानी मॉस्कोला भारतीय शिष्टमंडळाला घेऊन जाणारे विमान गुरुवारी ४० मिनिटे आकाशात प्रदक्षिणा घालत राहिले. कारण त्याच वेळी युक्रेनकडून मॉस्कोवर ड्रोन हल्ले झाले होते. यामुळे विमानाच्या लँडिंगलाही विलंब झाला. या शिष्टमंडळाचे नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोझी करत आहेत.
रशियन (Russia) अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हवाई संरक्षण दलाने रात्री १०५ ड्रोन पाडले, त्यापैकी २६ मॉस्कोच्या दिशेने उड्डाण करत होते. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी टेलिग्रामवर सांगितले की, ढिगारा पडल्याने काही ठिकाणी नुकसान झाले आहे, परंतु कोणतीही दुखापत झाली नाही. रशियन माध्यमांनुसार, मॉस्कोपासून सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर असलेल्या येलेट्स शहरावर अनेक युक्रेनियन ड्रोनने हल्ला केला. युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांमुळे १५३ रशियन (Russia) उड्डाणांवर परिणाम झाला. एव्हिएशन एजन्सी रोसावियात्सियाने मॉस्कोच्या शेरेमेत्येवो, डोमोडेदोवो, झुकोव्स्की आणि वनुकोवो विमानतळांवरील उड्डाणे तात्पुरती स्थगित केली. त्यामुळे हजारो प्रवाशांचे हाल झाले.
(हेही वाचा Pakistan ची अण्विक शक्ती आणि भारताने केलेली कारवाई)
शिष्टमंडळ रशिया, स्पेनसह पाच देशांना देणार भेट
मॉस्कोमधील भारतीय राजदूत विनय कुमार यांनी डोमोडेडोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिष्टमंडळाचे स्वागत केले आणि त्यांना भारत-रशिया संबंधांची माहिती दिली. भेट देणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व द्रमुक खासदार कनिमोझी करत आहेत. त्यांच्यासोबत शिष्टमंडळात खासदार राजीव राय, कॅप्टन ब्रिजेश चौटा, प्रेमचंद गुप्ता, अशोक मित्तल आणि राजदूत मंजीव पुरी यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ रशियामार्गे स्लोव्हेनिया, ग्रीस, लाटविया आणि स्पेनला भेट देईल.
Join Our WhatsApp Community