Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत ‘नारी शक्ती’ ठरणार निर्णायक  

राज्यात लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे भवितव्य ठरविण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल. कारण २००४, २००९, २०१४ आणि २०२९ च्या तुलनेपेक्षा २०२४ मध्ये महिला मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

196
Lok Sabha election 2024 : लोकसभा निवडणुकीत ‘नारी शक्ती’ ठरणार निर्णायक

अठराव्या लोकसभेसाठी (18th Lok Sabha Election) निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात सात टप्प्यांत निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे. या निवडणूकीत उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यात यंदा महिला मतदारांचा महत्त्वाचा वाटा असेल.  २००९, २०१४, २०१९ या तीन निवडणुकांच्या तुलनेमध्ये लोकसभा २०२४  मध्ये महिला मतदारांचा टक्का वाढला आहे. (Lok Sabha election 2024)

सरकार कुणाचं महिलांची भूमिका महत्वाची 

२०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा (Lok sabha 2014 and 2019) निवडणुकांसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा (Male Voters) कमी होती. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या मतदार नोंदणीत महिला मतदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे भविष्यात देशात कुणाचं सरकार येणार हे ठरवण्यात महिलांची मोठी भूमिका महत्वाची आहे.  (Lok Sabha election 2024)

(हेही वाचा – Shivsena : अखेर बबनराव घोलप शिंदे गटात दाखल )

०१ हजार पुरुषांमागे एवढी महिला संख्या  

२०११ च्या जनगणनेनुसार १ हजार पुरुषांमागे ९२५ महिला असे प्रमाण होते. सन २०१४ मध्ये मतदार यादीतील महिलांचे प्रमाण १ हजार पुरुषांमागे ८८९ महिला इतके होते. सन २०१९ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९११ महिला असे प्रमाण होते. २०२४ मध्ये १ हजार पुरुषांमागे ९२३ महिला अशी लक्षणीय सुधारणा झाली आहे. राज्यात मतदारांची संख्या लक्षणीय वाढली असून त्यात महिला मतदारांची संख्या लक्षणीय म्हणजे ०४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ इतकी आहे. (Lok Sabha election 2024)

(हेही वाचा – Ashok Chavan : अशोक चव्हाण यांनी घेतली खासदारकीची शपथ)

२०२४ एकूण मतदार किती ?

२०२४ मध्ये ५ एप्रिल २०२४ नुसार एकूण ९ कोटी २६ लाख ३७ हजार २३० एकूण मतदार असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये ४ कोटी ८६ लाख ०४ हजार ७९८ पुरुष मतदार आहेत. तर ४ कोटी ४४ लाख १६ हजार ८१४ महिला मतदार (Women voters) आणि ५ हजार ६१८ तृतीयपंथी मतदार (Transgender Voter)आहेत. (Lok Sabha election 2024)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.