Election Commission of India च्या निकालाने विधानसभा अध्यक्षांचे काम सोपे, अजित पवार गट मजबूत

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या दोन्ही गटांची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर पूर्ष झाली असून आता निकालाची प्रतिक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश दिले असले तरी त्यापुर्वी निकालवाचन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

186
Election Commission of India च्या निकालाने विधानसभा अध्यक्षांचे काम सोपे, अजित पवार गट मजबूत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि निवडणूक चिन्ह ‘घड्याळ’ (Clock) यावर अजित पवार (Ajit Pawar) यांचा हक्क असल्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने देऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांचे काम सोपे केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या निकालात पाच आमदारांनी आणि एका खासदाराने दोघांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिल्याची धक्कादायक माहिती दिली. (Election Commission of India)

निकालवाचन १५ फेब्रुवारीच्या आधीच शक्यता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची सुनावणी विधानसभा अध्यक्षांसमोर पूर्ण झाली असून आता निकालाची प्रतिक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाने १५ जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश दिले असले तरी त्यापुर्वी निकालवाचन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभा अध्यक्षांसमोर आठवडाभर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांची साक्ष नोंदणी, उलटतपासणी झाली. शरद पवार गटाचे जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हेमंत टकले तर अजित पवार गटाच्या सुनील तटकरे, अनिल भाईदास पाटील यांची उलटतपासणी झाली. त्यानंतर सलग दोन दिवस दोन्ही गटाच्या वकिलांनी अंतिम युक्तिवाद मांडला. (Election Commission of India)

(हेही वाचा – Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचे हिंदुत्व बेगडी; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका)

५ आमदार आणि एका खासदाराने दिले दोघांना समर्थन

केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या निकालात पाच आमदारांनी आणि एका खासदाराने दोन्ही गटाच्या बाजूने प्रतिज्ञापत्र दिले. “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार, आमदार यांच्यासह एकूण आमदारांची संख्या ८१ आहे. अजित पवार यांच्यावतीने एकूण ५७ समर्थनाची शपथपत्रे दाखल करण्यात आली, तर शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावतीने एकूण २८ प्रतिज्ञापत्र दाखल केली. तथापि, पाच आमदार आणि एका लोकसभा खासदाराने दोन्ही गटांच्या समर्थनार्थ शपथपत्रे सादर केली आहेत. दोन्ही गटांसाठी प्रतिज्ञापत्र सादर केलेल्या ६ आमदारांचा (५ आमदार आणि १ लोकसभा खासदार) पाठिंबा शरद पवारांच्या गटासाठी गृहीत धरला, तरीही अजित पवार यांच्याकडे विधानसभेत ८१ पैकी ५१ आमदारांसह संख्यात्मक बहुमत असेल तर शरद पवार यांच्याकडे केवळ २८ आमदारांचा पाठिंबा असेल.” या निकलामुळे अजित पवार यांच्या विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुरू असलेल्या प्रकरणाला अधिक बळ मिळेल. (Election Commission of India)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.