नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार ; Chandrashekhar Bawankule यांच विधान

82
नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार ; Chandrashekhar Bawankule यांच विधान
नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार ; Chandrashekhar Bawankule यांच विधान

राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होतील आणि या सर्व निवडणुका महायुतीच लढवणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली. विधानसभेप्रमाणेच या निवडणुकांमध्येही महायुती विजयी होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मंत्री बावनकुळे नाशिकमधील महसूल आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीसाठी आले होते. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा-Delhi Heavy rain : दिल्लीत जोरदार पाऊस ! विमानांच्या 100 फेऱ्या रद्द , अनेक भागांत पाणी साचले

बावनकुळे म्हणाले निवडणुका आता कोणालाही पुढे ढकलता येणार नाहीत. पावसाळा संपताच निवडणुकीचे वारे सुरू होतील. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये विधानसभेसारखा जोरदार रणसंग्राम पाहायला मिळेल. महायुती म्हणूनच आम्ही या निवडणुका लढवणार आहोत आणि सर्व ठिकाणी आमचाच विजय होईल. सर्वच निवडणुकांमध्ये महायुतीचे महापौर आणि जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून येतील. मुंबईत आमचे मोठे काम सुरू आहे, त्यामुळे मुंबईचा महापौरही महायुतीचाच होईल,असे त्यांनी सांगितले. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा- Mumbai Rain : मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार ; कोकण किनारपट्टीवर काळ्याकुट्ट ढगांची गर्दी , IMD चा अंदाज काय ?

पालकमंत्री निवडीबाबत विचारले असता, त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच यावर योग्य निर्णय घेतला जाईल. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आमदार असल्यामुळे त्यांना पालकमंत्री पद पाहिजे आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील नाशिकचे पालकमंत्री पद पाहिजे आहे. त्यामुळे निर्णय झालेला नाही. शिवसेना (ठाकरे गट) व मनसेसोबत युतीबाबत विचारले असता ते म्हणाले, हे दोन्ही पक्ष प्रगल्भ नेत्यांचे आहेत. योग्य निर्णय तेच घेतील. मला त्यावर बोलायचा अधिकार नाही. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा- BMC : कचऱ्याचे कंत्राट संपुष्टात, नवीन कंत्राटात फसवणूक टाळून महापालिकेचे वाचवले जाणार कोट्यवधी रुपये

पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर ते म्हणाले, ही घटना अतिशय गंभीर आहे. आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. सरकारनेही याची गांभीर्याने दखल घेतली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळेल, असेही बावनकुळे यांनी सांगितले. बऱ्याच ठिकाणी पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि उर्वरितही लवकरच पूर्ण होतील, अशी माहिती त्यांनी दिली. (Chandrashekhar Bawankule)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.