शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी सांगलीतून मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. डबल महाराष्ट्र केसरी, ठाकरेंचे विश्वासू आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राहिलेले चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान करत या चर्चांना उधाण आणलं आहे. (Chandrahar Patil)
चंद्रहार पाटील – शिंदेंच्या दिशेने पाऊल?
सांगलीतील भाळवणी गावात मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात चंद्रहार पाटील यांनी सामंतांचा सत्कार केला आणि त्यांना चांदीची गदा भेट दिली. याच वेळी सामंत म्हणाले, “चंद्रहार पाटील यांनी आमच्या गळ्यात हार घातलाय, आता त्यांच्या गळ्यात शिंदे साहेबांनी हार कधी घालायचा हे त्यांनी ठरवावं.” या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Chandrahar Patil)
ठाकरेंनी दिलेली संधी, पण आता…?
लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरेंनी काँग्रेससोबत संघर्ष करत सांगली मतदारसंघ खेचून आणला होता. मात्र, निवडणुकीनंतर पाटील यांची ठाकरे गटापासून नाराजी वाढल्याचे दिसून येत आहे. नुकताच बीड दौरा टाळणं, सार्वजनिक कार्यक्रमांना दूर राहणं यामुळे पाटील यांचा झुकाव शिंदे गटाकडे असल्याच्या चर्चा होत्या. आता त्या अधिकृत घोषणेसाठीच वेळ बाकी आहे, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (Chandrahar Patil)
गेल्या काही महिन्यांपासून सतत गळतीचा सामना करणाऱ्या ठाकरे गटासाठी सांगलीतील ही हालचाल मोठा धक्का ठरू शकते. डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या चंद्रहार पाटील यांच्या शिंदे गटात प्रवेशाने पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेना राजकारणाला वेगळी कलाटणी मिळू शकते. (Chandrahar Patil)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community