Khalistani : अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दहशतवाद चालणार नाही; खलिस्तानींच्या धमकीवर भारताची ठाम भूमिका

134

कॅनडात खलिस्तानवाद्यांकडून पोस्टरबाजी केली जात असून, त्यात 8 जुलै रोजी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर यांच्यासाठी रॅली काढण्यात येणार आहे. यासाठी भारतीय उच्चायुक्तालयातील दोन अधिकाऱ्यांचे छायाचित्रे लावून त्यांना मारेकरी ठरवण्यात आले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने कॅनडा सरकारला सुरक्षा पुरवण्यास सांगितले आहे.

परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बाग यांनी यासंदर्भात म्हटले की, कॅनडातील पोस्टर्स आक्षेपार्ह आहेत, आम्ही त्याचा निषेध करतो. या प्रकरणी आम्ही कॅनडा सरकारला सांगितले आहे की, ही गंभीर बाब आहे. त्यांना त्यांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांचे संरक्षण करण्यास सांगितले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अधिकारांचा गैरवापर होत आहे. आमचेअधिकारी त्यांचे काम भीती न बाळगता मोकळेपणाने करू शकतील याची खात्री सरकारने द्यावी. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली दहशतवाद पसरवणे, हिंसक कारवायांना प्रोत्साहन देणे आणि फूट पाडण्याचे धोरण अस्वीकार्य आहे. कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांची वक्तव्ये आपण प्रसारमाध्यमांमध्ये पाहिली आहेत, परंतु हा भाग अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा नसून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर करून हिंसाचाराला प्रोत्साहन देणारा आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, लंडनमध्ये घटना घडल्या आहेत, त्यावर व्होट बँकेच्या राजकारणाचा मुद्दा बनवू नका, असे आम्ही म्हटले आहे. अमेरिकेबद्दल बोलायचे झाले तर सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय उच्चायुक्तालयाला २ जुलै रोजी आग लागली होती. त्याला स्थानिक प्रशासनाने तात्काळ ताब्यात घेतले. आम्ही हे प्रकरण तात्काळ अमेरिकन प्रशासनाकडे मांडले आहे. अमेरिकन प्रशासनाने यावर तातडीने पावले उचलली आहेत. अधिकाऱ्यांना सुरक्षा पुरवणे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. आम्ही विविध देशांच्या संपर्कात आहोत.

(हेही वाचा Tomato : पेट्रोलपेक्षाही टॉमेटो महाग; मुंबईत इतर भाज्यांचे काय आहेत नवे दर?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.