राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव(Tej Pratap Yadav) यांनी त्यांच्या मुलाची पक्षातून हकालपट्टी केली आहे. लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव(Tej Pratap Yadav) यांच्यावर मोठी कारवाई केली असून पुढील ०६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे. लालू प्रसाद यादव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. (Tej Pratap Yadav)
(हेही वाचा Pakistan Blast : एकामागून एक ३ वाहने उडवली…; कराची-क्वेट्टा महामार्गावर पुन्हा एकदा हल्ला, ३२ सैनिक ठार )
लालू प्रसाद यादव यांनी पोस्टमध्ये म्हटले की, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचे(Tej Pratap Yadav) आयुष्यातील चढउतार, सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वर्तन हे आपल्या कौटुंबिक मूल्यांना आणि संस्कारांना अनुरूप नाही. म्हणून, वरील परिस्थितीमुळे, मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून काढून टाकतो, असे यादव यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
(हेही वाचा भारताला China कडून सर्वाधिक धोका; चारही बाजूने विणतोय लष्करी जाळे )
दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी मुलगा तेज प्रताप यादव(Tej Pratap Yadav) यांना पक्ष आणि कुटुंबातून दूर सारले आहे. त्यांनी म्हटले की, आतापासून त्याला पक्ष आणि कुटुंबात कोणत्याही प्रकारची भूमिका राहणार नाही. त्याला पुढील ०६ वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
निजी जीवन में नैतिक मूल्यों की अवहेलना करना हमारे सामाजिक न्याय के लिए सामूहिक संघर्ष को कमज़ोर करता है। ज्येष्ठ पुत्र की गतिविधि, लोक आचरण तथा गैर जिम्मेदाराना व्यवहार हमारे पारिवारिक मूल्यों और संस्कारों के अनुरूप नहीं है। अतएव उपरोक्त परिस्थितियों के चलते उसे पार्टी और परिवार…
— Lalu Prasad Yadav (@laluprasadrjd) May 25, 2025
काय आहे संपूर्ण प्रकरण?
आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव(Tej Pratap Yadav) आणि त्यांची प्रेयसी अनुष्का यादव यांच्याशी संबंधित प्रकरणात कारवाई केली आहे. गेल्या शनिवारी दि. २४ मे २०२५ रोजी तेज प्रताप यादव यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक फोटो शेअर करण्यात आला होता. त्या फोटोमध्ये तेज प्रताप यादव एका मुलीसोबत दिसत होते. त्या मुलीचे नाव अनुष्का यादव असल्याचे सांगण्यात आले. पोस्टमध्ये लिहिले होते की, तेज प्रताप यादव १२ वर्षांपासून अनुष्का यादवसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. परंतु, नंतर ती पोस्ट काढून टाकण्यात आली.(Tej Pratap Yadav)