धर्मांध तबलीगींचे हिंदूविरोधी कारस्थान

129

तबलीगी, जमात आणि मरकज हे तीन वेगवेगळे शब्द आहेत. तबलीगी या शब्दाचा अर्थ आहे अल्लाहच्या संदेशांचा प्रचार करणारा. जमात याचा अर्थ आहे समूह. मरकज याचा अर्थ आहे बैठक. अल्लाहच्या विचारांचा प्रचार करणारा समूह म्हणजे तबलीगी जमात. याचे मुख्य कार्यालय दिल्लीच्या निजामुद्दीन भागात आहे. तबलीगी जमातचे संपूर्ण जगात १५ कोटी सभासद आहेत. ही संघटना गेली शंभर वर्षे काम करत आहे.

तबलीगी जमात प्रारंभी इस्लामचा प्रचार आणि प्रसार करणारी संस्था होती. मुसलमान धर्मासंबंधी माहिती देण्याचे काम करत होती. मुघलांच्या काळात ज्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता त्या लोकांनी पुन्हा हिंदू परंपरा आणि रीती रिवाजाप्रमाणे नित्य जीवन जगण्यास आरंभ केला होता. धर्मांतरित झालेल्या मुसलमानांच्या मनात जे हिंदू विचार मूळ धरून राहिले आहेत ते काढून टाकण्यासाठी आणि त्या जागी मुसलमानांची जीवनशैली रुजवण्यासाठी तबलीगी जमात कार्य करू लागली. विशेषतः मुसलमानांची जीवनशैली, पोशाख, चालीरीती, भाषा, दाढी राखणे. याचे पद्धतशीर प्रशिक्षण देण्यास आरंभ झाला. मुसलमानांना हिंदू समाजापासून दूर ठेवणे हे तबलीगी जमातचे मूळ उद्दिष्ट आहे.

(हेही वाचा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या सेवा-समर्पित राष्ट्राभिमानी कार्यकारिणीला पुन्हा संधी!)

मुसलमानांना शरीयतच्या प्रभावाखाली आणणे आणि त्यांच्यात हिंदूंच्या चालीरीतींबद्दल घृणा निर्माण करणे यावर तबलीगी जमात जोर देत आहे. मुसलमानांना अधिक कडवे बनवणे हेच या संघटनेचे प्रमुख कार्य आहे. हिंदू आणि मुसलमान हे परस्परांमध्ये मिसळून जीवन जगतात त्यामुळे मुसलमानांवर हिंदूंचा प्रभाव पडतो असे मौलाना इलियास यांना वाटायचे. त्यामुळे मुस्लिम समाजाला हिंदूंपासून दूर ठेवणे आज या संघटनेचा मूळ उद्देश आहे.

या संघटनेत मशिदीच्या वरिष्ठ मौलाना मध्यवर्ती समितीत असतात. या संघटनेसाठी  ते चोवीस तास काम करतात. काही तबलीगी विविध ठिकाणी फिरून अल्लाहच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करतात. त्यांचा स्थानिक मशिदीत राहण्याचा कालावधी चार दिवसापासून ते एक वर्षापर्यंत असा असतो. या कालावधीत हे स्थानिक मशिदीमध्ये राहतात. दुपारी आजूबाजूच्या घरांना भेट देतात. सर्वांना संध्याकाळी मशिदीत येण्यास सांगतात. घरोघरी जाऊन भेट घेतात. या भेटीत हिंदूंशी साधर्म्य असलेल्या कोणत्याही गोष्टी करायच्या नाहीत असे त्यांच्या मनावर ठसवले जाते. ठराविक काळासाठी, ठराविक कामासाठी, काम करणारे लोक यामध्ये असल्यामुळे तबलीगींची संख्या नेमकी किती आहे ते सांगता येत नाही.

इस्लाम धर्म हा हिंदुस्थानच्या भूमीत स्थापन झालेला धर्म नाही. बाहेरच्या देशातून आक्रमक म्हणून इस्लाम धर्माच्या अनुयायांनी हिंदुस्थानात प्रवेश केला.‌ शस्त्रबळावर त्यांनी धर्मांतर घडवून आणले. धर्मांतरित झालेल्या मुसलमानांवर हिंदू संस्कृतीचे काही संस्कार झाले असतील तर ते नष्ट करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात तबलीगी जमात ही संघटना करते. हिंदुस्थानातील लोकशाहीत संख्येला अत्यंत महत्त्व आहे. या देशावर राजकीय सत्ता पुन्हा प्रस्थापित करायची असेल तर मुसलमानांची संख्या वाढवणे नितांत आवश्यक आहे. हे उद्दिष्ट समोर ठेवून धर्मांतराचे कार्य करण्यासाठी तबलीगी जमात कार्यरत झाली आहे.
शांततेने इस्लामचा प्रचार आणि जिहाद या दोन्ही गोष्टी कौशल्याने केल्या जात आहेत. त्यासाठी योग्य जागा, योग्य वेळ आणि परिस्थिती याचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जातो.‌ तबलीगी जमातचे अनुयायी किंवा सभासद हे टेहळणी करण्याचे काम गावातून करत असतात. त्यांनी जमा केलेली माहिती ते त्यांच्या नेत्याकडे पोहोचवण्याचे काम करतात.

वर्ष १९९२-१९९३ च्या काळात विविध ठिकाणच्या मंदिरांवर एकाच वेळी हल्ले करण्यात आले. असा आरोप  तबलीगी जमातीवर करण्यात आला आहे.   अमेरिका, फ्रान्स, फिलीपिन्स अशा जगातल्या अनेक देशांना जिहादी आणि तबलीगी जमात या दोघांमध्ये जिव्हाळ्याचे संबंध असल्याचे आढळून आले आहे.

हिंदुस्थानातील राजकीय पक्षांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन आपसात भांडण्याऐवजी राष्ट्ररक्षणार्थ अशा राष्ट्रघातक संघटनांच्या विरोधात संघटित होऊन देशरक्षणासाठी विचार करणे आणि त्यानुसार कृती करणे नितांत आवश्यक आहे. अन्यथा आपसातील दुहीमुळे राष्ट्रविघातक शक्ती बलाढ्य होईल आणि त्यात राष्ट्राची हानी होईल.

देशातली सत्ता प्राप्त व्हावी म्हणून मुसलमानांच्या अवाजवी मागण्या मान्य करणे, त्यांना विविध प्रकारच्या सवलती  देणे, त्यांच्या अमानवीय कृत्यांकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या आक्रमक आणि राष्ट्रघातक कृत्यांकडे दयार्द्र बुद्धीने पाहणे राजकीय नेत्यांनी सोडून देणे नितांत आवश्यक आहे. उद्या हेच लोक तुम्हाला काफीर समजून तुमचाही जीव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून राष्ट्रहितासाठी, राष्ट्ररक्षणासाठी आपसातले वैर सोडून संघटित होणे काळाची गरज आहे.

लेखक – दुर्गेश जयवंत परुळकर, व्याख्याते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.