सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक संस्थांच्या Election वर निर्णय; राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनो, तयारीला लागा… 

सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे.

92

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Election) सुमारे तीन वर्षांपासून प्रलंबित आहेत. या निवडणुका मार्च 2022 पासून रखडल्या असून, त्यामागील मुख्य कारण म्हणजे ओबीसी (इतर मागासवर्गीय) समाजाच्या राजकीय आरक्षण संदर्भातील न्यायालयीन प्रक्रियात अडकली आहे. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भातील याचिकांवर सुनावणी सुरू असल्याने या निवडणुका (Election) झालेल्या नाहीत. मात्र, आता चार महिन्यात या निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राजकारणात असणाऱ्या पदाधिकाऱ्यांसाठी ‘तयारीला लागा’ असा संदेश देणारा हा आदेश आहे.

प्रलंबित निवडणुकांची माहिती

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 29 महापालिका, 257 नगर परिषद, 26 जिल्हा परिषद, 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका (Election) रखडल्या आहेत. त्यामुळे या संस्थांमध्ये निवडणुका न झाल्यामुळे प्रशासकांमार्फत कारभार सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2025 च्या मे महिन्यात निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली होती. परंतु हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होते. आता या बाबतचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. या निवडणुकांच्या विलंबामुळे स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधित्वाचा अभाव जाणवत असून, नागरिकांमध्ये असंतोषाची भावना होती. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आता निवडणुकांची प्रक्रिया सुरू होण्याची अपेक्षा आहे.

(हेही वाचा India Vs Pakistan War : पाकड्यांना आणखी एक धक्का ! फ्रान्स आणि जर्मन विमान कंपन्यांचा पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास नकार)

निवडणुका प्रलंबित असलेल्या महापालिका 

  • बृहन्मुंबई महानगरपालिका (मुंबई) – 1888
  • पुणे महानगरपालिका – 1950
  • नागपूर महानगरपालिका – 1951
  • सोलापूर महानगरपालिका – 1964
  • कोल्हापूर महानगरपालिका – 1972
  • ठाणे महानगरपालिका – 1982
  • पिंपरी-चिंचवड महानगरपालिका- 1982
  • नाशिक महानगरपालिका – 1982
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिका – 1982
  • छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका – 1982
  • अमरावती महानगरपालिका 1983
  • नवी मुंबई महानगरपालिका – 1992
  • नांदेड-वाघाळा महानगरपालिका – 1997
  • उल्हास नगर महानगरपालिका 1992
  • सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका – 1998
  • अकोला महानगरपालिका – 2001
  • मालेगाव महानगरपालिका 2001
  • मीरा-भाईंदर महानगरपालिका 2002
  • भिवंडी-निजामपूर महानगरपालिका – 2002
  • जळगाव महानगरपालिका 2003
  • अहिल्या नगर महानगरपालिका – 2003
  • धुळे महानगरपालिका – 2003
  • वसई-विरार महानगरपालिका – 2009
  • लातूर महानगरपालिका – 2011
  • चंद्रपूर महानगरपालिका – 2012
  • परभणी महानगरपालिका 2012
  • पनवेल महानगरपालिका 2016
  • इचलकरंजी महानगरपालिका 2022
  • जालना महानगरपालिका 2023

प्रलंबित जिल्हा परिषदांची यादी

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर (अहिल्या नगर), पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर), जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद (धाराशिव), लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.