विद्यार्थी परिषद ते तिसऱ्यांदा केंद्रात मंत्रीपद; Nitin Gadkari यांचा राजकीय प्रवास

163

केंद्रीय मंत्रिमंडळाचा (Cabinet Minister) शपथविधी रविवारी सायंकाळी पार पडला आहे. यापूर्वी नागपूरमधून (Nagpur) सलग दोन वेळा निवडून गेलेले आणि सलग दोनही वेळेत मंत्रिमंडळात स्थान पटकावलले तिसऱ्यांदा विजयी झाल्यावर नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी पुन्हा मंत्रिमंडळात मंत्री म्हणून शपथ घेतली. गडकरी यांच्या कुटुंबात पत्नी कांचन गडकरी, मुले निखिल व सारंग, विवाहित मुलगी केतकी कासखेडीकर यांचा समावेश आहे. (Nitin Gadkari)

गडकरींनी 1976 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. नंतर वयाच्या 23 व्या वर्षी ते भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष झाले. 2005 मध्ये ते भाजपाचे प्रदेशाध्यक्षही होते. 2009-2013 पर्यंत ते भारतीय जनता पक्षाचे (भाजप) राष्ट्रीय अध्यक्ष होते. वयाच्या बावन्नव्या वर्षी ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष झाले आणि या पक्षाचे ते सर्वात तरुण अध्यक्ष होते. त्यांचा जन्म 27 मे 1957 रोजी नागपूर येथे एका कृषक कुटुंबात झाला.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर नागपूरकर गडकरी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. २०१४ मध्ये त्यांनी प्रथम नागपूरमधून लोकसभा निवडणूक जिंकली व त्यात त्यांनी काँग्रसेचे दिग्गज नेते विलास मुत्तेम वार यांचा तब्बल 2 लाख 86 हजार मतांनी पराभव केला होता.

(हेही वाचा – Modi 3.0 : नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची हॅटट्रीक; राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळ्याला सुरुवात)

सलग दोन्ही मंत्रिमंडळात होते स्थान

पहिल्यांदाच लोकसभा गाठणाऱ्या गडकरी यांना मोदी यांनी मंत्रिमंडळातही स्थान दिले. 2014 च्या पहिल्या केंद्रीय मंत्रीमंडळात ते रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी, जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन, ग्रामीण विकास आणि पंचायती राज मंत्री होते. तर 2019 मध्ये त्यांच्याकडे रस्ते विकास खाते आहे.

2019 च्या निवडणुकीत ते पुन्हा नागपूरमधून विजयी झाले. या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य सत्तर हजाराहून अधिक मतांनी कमी झाले. मात्र मोदी-2 च्या मंत्रिमंडळातही गडकरी यांना संधी मिळाली. पाच वर्षात त्यांनी पुन्हा रस्ते विकास व दळणवळण मंत्रालयात अनेक कामे केली.

2014 ची निवडणूक गडकरींना तुलनेने कठीण गेली. पाच लाखांहून अधिक मतांनी आपण विजयी होऊ असा विश्वास गडकरी यांना होता. प्रत्यक्षात ते १ लाख ३७ हजार मतांनीच विजयी होऊ शकले. त्यामुळे त्यांनी विजयाचा जल्लोषही साजरा केला नाही.

(हेही वाचा – Modi 3.0 : राष्ट्रवादीने नाकारले राज्यमंत्री पद; Ajit Pawar कॅबिनेट मंत्रीपदासाठी आग्रही)

पहिल्या यादीत गडकरींचा समावेश

नागपूरमधून सलग तीन वेळा विजयी होऊन गडकरींनी केंद्रात मंत्रीपद पटकावले. गडकरी दोन दिवसांपासून दिल्लीतच मुक्कामी होते. एनडीएचे सरकार स्थापन होणार हे स्पष्ट झाल्यावर मंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली होती. महाराष्ट्रातील संभाव्य मंत्र्यांच्या यादीत गडकरी यांचे नाव पहिल्या क्रमांकावर होते. लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारांच्या पहिल्याच यादीत अपेक्षित असतानाही नितीन गडकरींचे नाव नव्हते. त्यामुळे याही वेळी मंत्रीमंडळात पहिल्यांदाच त्यांचे नाव येते की विस्तारात समावेश होतो अशी शंका कार्यकर्त्यांना होती. मात्र, गडकरी यांना मंत्रीपदाची शपथ घेण्याबाबत पीएमओमधून दूरध्वनी आल्या नंतर हा संभ्रम दूर झाला.

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.