State Monsoon Session : निरोपासाठी तरी सभागृहात या; एकनाथ शिंदे यांचा ठाकरे यांना टोला

143
State Monsoon Session : निरोपासाठी तरी सभागृहात या; एकनाथ शिंदे यांचा ठाकरे यांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘निरोप समारंभासाठी तरी यायला हवं की नाही सभागृहात? असा प्रश्न करत ‘फेसबुक लाईव्ह वरच निरोप समारंभ करणार का?’ असा टोलाही हाणला. (State Monsoon Session)

आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते

राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन आणि या टर्ममधील सरकारचे शेवटचे अधिवेशन गुरुवारी २७ जूनपासून सुरू होत आहे. बुधवारी सायंकाळी सरकारच्या चहा-पान कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, “आणि निरोप द्यायचा की घ्यायचा हे जनता ठरवेल. आम्ही जनतेची सेवा केलेली आहे. आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते आहोत. आम्ही जमिनीशी जोडलेले कार्यकर्ते आहोत, ज्यावेळी शेतकऱ्यांवर आपत्ती येते तेव्हा आम्ही शेतात जातो, महापुरात जातो. जिथे आपत्ती येते तेथे जातो. घरात बसत नाही,” असे म्हणत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला मारला. (State Monsoon Session)

(हेही वाचा – Vaishwik Hindu Rashtra Mahotsav : काशी विश्वेश्वर मंदिर मुक्तीसाठी लढा देणारे अधिवक्ते आणि याचिकाकर्ते यांचा सत्कार!)

हे शेवटचे अधिवेशन

उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारचे हे शेवटचे अधिवेशन असल्याचा टोमणा मारला होता. त्यावर उत्तर देताना शिंदे यांनी ठाकरे यांना टोला लगावला. या टर्मचे हे शेवटचे अधिवेशन असेल. त्यामुळे आमदारांनी लोकांचे प्रश्न मांडले पाहिजे, चर्चेत भाग घेतला पाहिजे आणि न्याय मिळवून घेतला पाहिजे, असे मत शिंदे यांनी व्यक्त केले. (State Monsoon Session)

‘खोटे नेरेटीव्ह’ची फॅक्टरी

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावेळी विरोधकांवर तोफ दंगली. खोटे नेरेटीव्ह तयारी करण्याची फॅक्टरी यांनी उभी केली आहे, त्याला आम्ही अधिवेशनात उत्तर देऊ. “खोटं बोल, पण रेटून बोल. खोटे नेरेटीव्ह बनवून एका निवडणुकीत मतं मिळाल्यानंतर आता खोटच बोलायचं, या मानसिकतेत विरोधी पक्ष आहे. विदर्भातील सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यात आलेले अपयश आले, असा आरोप विरोधक करतात. पान ज्यांनी विदर्भातील एकाही प्रकल्पाला सुधारित मंजूरी दिली नाही, तेच आता आम्हाला सांगत आहेत. पण आमच्या सरकारने केवळ सुधारित मंजूरी दिली नाही तर त्याची कामेही सुरू केली आहेत,” असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केले. राज्यात सुरू असलेल्या ड्रग्ज कारवाई, पेपरफुटी प्रकरणावरही फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली. पेपर फुटीच्या घटना या ठाकरे यांच्याच काळातील असून सर्वात जास्त पेपरफूट ही उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाली आहे. जवळपास सर्वच परीक्षांमध्ये ही पेपरफूट झाली होती, आणि ते आम्हाला प्रश्न विचारत आहेत?” असा सवाल त्यांनी केला. उद्योग आणि गुंतवणुकीत त्यांच्या काळात ३-४ नंबरवर गेलेला महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात गेल्या दोन वर्षांपासून पहिल्या क्रमांकवर आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. (State Monsoon Session)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.