सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमधील काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता अधिकच बळावली आहे. आमदार सतेज (बंटी) पाटील (Satej Patil) यांच्या गोटातील तब्बल दहा ते बारा माजी नगरसेवक, उपमहापौर, सभापती शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
या घडामोडींमुळे कोल्हापुरातील काँग्रेस (Congress) नेतृत्व अडचणीत येण्याची चिन्हं आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा (Mahayuti) घटक म्हणून सत्ताधारी पक्षात सामील होण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने (Congress) उमेदवारी नाकारल्याने नाराज असलेल्या नेत्यांमध्ये असंतोष वाढल्याचं चित्र आहे. याचा फटका कोल्हापूरसह दक्षिण मतदारसंघात काँग्रेसला (Congress) बसला होता.
(हेही वाचा – कळवा-खारेगावातील माजी नगरसेवकांचा Shiv Sena प्रवेश; जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का)
दरम्यान, काँग्रेसचा (Congress) एक माजी सभापती या घडामोडींमध्ये प्रमुख भूमिका बजावत असून, पक्षांतरासाठी बैठका सुरू झाल्याची माहिती आहे. शिंदे गटाचे नेतेही या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. मात्र सध्या फक्त तीन नगरसेवकच ठामपणे शिंदे गटात जाण्याच्या भूमिकेवर असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोठा पक्षप्रवेश तात्पुरता स्थगित झाला असून, पुढील आठवड्यात या नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
या संभाव्य पक्षांतरामुळे आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या वर्चस्वाला धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण कोल्हापूर महानगरपालिकेतील काँग्रेसचे नेतृत्व मुख्यतः त्यांच्या हाती आहे. त्यामुळे आगामी स्थानिक निवडणुकांपूर्वी ही राजकीय हालचाल काँग्रेससाठी मोठा संकेत ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community