सुप्रिया सुळेंना सल्ला देत पक्ष सोडण्याच्या चर्चेवर Sonia Doohan म्हणाल्या…

मी सध्या इतर कोणता पक्ष जॉईन करणार नाही, सुप्रिया सुळेंना त्यांचं मंथन करण्याची गरज आहे. लोका त्यांना का सोडून जात आहेत, याचा विचार त्यांनी करावा, असे Sonia Doohan यांनी म्हटले आहे.

164
सुप्रिया सुळेंना सल्ला देत पक्ष सोडण्याच्या चर्चेवर Sonia Doohan म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंना सल्ला देत पक्ष सोडण्याच्या चर्चेवर Sonia Doohan म्हणाल्या...

शरद पवारांची मुलगी म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासाठी आम्हाला आदर आहे. त्या आमच्या प्रमुख कधीच होऊ शकल्या नाहीत. लीडर होण्यात त्या कमी पडल्या. मी लवकर पक्ष जोडण्याचा निर्णय घेईन, मी सध्या इतर कोणता पक्ष जॉईन करणार नाही, सुप्रिया सुळेंना त्यांचं मंथन करण्याची गरज आहे. लोका त्यांना का सोडून जात आहेत, याचा विचार त्यांनी करावा, असे आरोप शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या विश्वासू महिल्या नेत्या सोनिया दुहान (Sonia Doohan) यांनी केले आहेत.

(हेही वाचा – Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ‘हिंदुत्व’ या विषयावरील कोट्स!)

२७ मे रोजी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. त्यात सोनिया दुहान दिसून आल्या होत्या. त्यानंतर लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनिया दुहान याही आता शरद पवार गटाची साथ सोडणार का, अशी चर्चा चालू होती. या चर्चांना स्वतः सोनिया दुहान यांनी पूर्णविराम दिला आहे.

सोनिया दुहान पुढे म्हणाल्या की, मी पक्ष सोडलेला नाही, मी इतर कोणत्याही पक्षात जाणार नाही. असं पाहायला गेलं तर, ज्या वेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबतच्या काही जणांनी वेगळा निर्णय घेतला, त्या वेळी सुप्रिया सुळेही तिथे दिसल्या होत्या. मग त्यांनीही पक्ष सोडला, असं म्हणायचं का? धीरज शर्मांसारखे सर्वच लोक शरद पवारांना का सोडत आहेत? मी आणि धीरज शर्मा आमच्यासाठी शरद पवारच आमचे लीडर आहेत. शरद पवार आमचे नेते होते, आहेत आणि यापुढेही राहतील.

कोण आहेत सोनिया दुहान?

सोनिया दुहान (Sonia Doohan) या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत होत्या. 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यावेळी त्या चर्चेत आल्या होत्या. सोनिया दुहान यांनी हॉटेलमध्ये जात अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले होते.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.