सोलापूरची विमानसेवा सुरू होणार! मुख्यमंत्री Devendra Fadanvis यांच्या उपस्थितीत सोमवारी पहिले विमान हवेत झेपावणार

120

सोलापूर ते गोवा विमानसेवेचा प्रारंभ सोमवारी ०९ जून या दिवशी सकाळी होणार आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) आणि केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. विमानसेवेचे सोलापूरकरांनी पाहिलेले अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. या विमानसेवेतून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्‍वास पालकमंत्री जयकुमार गोरे (Guardian Minister Jayakumar Gore) यांनी व्यक्त केला आहे. (Devendra Fadanvis)

(हेही वाचा – India A vs England Lions : दुसऱ्या अनधिकृत कसोटीत के. एल. राहुलचं शतक; भारतीय ए संघाच्या ७ बाद ३१९ धावा)

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Minister Mangalprabhat Lodha) यांची दरम्यान नियोजन भवनात पत्रकार परिषद झाली. यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांच्या भ्रमणध्वनीवरून पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. पालकमंत्री गोरे म्हणाले, १ ऑगस्टपासून सोलापूर ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याची तयारी झाली आहे. सोलापूर ते गोवा विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस या संदर्भातील घोषणा करतील, असा विश्‍वासही पालकमंत्री गोरे यांनी व्यक्त केला आहे. केंद्र शासनाच्या उडाण योजनेचा (Udaan Yojana) लाभ सोलापूरला द्यावा, यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.