ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांचा अवमान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरोधात बुधवारी अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. त्यानुसार आज त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असून साकेत न्यायालयात हजर केलं जाणार आहे. (Medha Patkar)
प्रकरण काय ?
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर त्यांच्या नर्मदा बचाओ आंदोलनासाठी ओळखल्या जातात. २००० साली त्यांच्याविरोधात दिल्लीत मानहानीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी दिल्ली न्यायालयात सुनावणी झाली असता त्यावर न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. यानुसार आज दिल्ली पोलिसांनी मेधा पाटकर यांना अटक केली आहे. (Medha Patkar)
बुधवारी मेधा पाटकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयात त्यांच्यावरील अटकेची कारवाई किमान दोन आठवड्यांसाठी स्थगित करावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. प्रोबेशन बाँडसंदर्भातदेखील याचिकेत उल्लेख करण्यात आला होता. न्यायालयाने मेधा पाटकर यांना मंगळवारी यासंदर्भात सत्र न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रोबेशन बाँड सादर करण्यात मेधा पाटकर यांना अपयश आल्यामुळे त्यांच्यावर अखेर अटकेची कारवाई करण्यात आली. (Medha Patkar)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community