Smriti Irani शिक्षकांसाठी झाल्या संकटमोचक

शिक्षण निरीक्षक ऐकत नसल्याचे पाहून इराणी यांनी, मी जर सर्व कागदपत्रे जमा करणे, नियम दाखवणे सुरू करू का. तुम्ही जर जाणीवपूर्वक वेतन देत नसाल, हे स्पष्ट झाले तर? असे म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला.

196
Smriti Irani शिक्षकांसाठी झाल्या संकटमोचक
Smriti Irani शिक्षकांसाठी झाल्या संकटमोचक

केंद्रीय मंत्री आणि अमेठीच्या खासदार स्मृती इराणी (Smriti Irani) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल होत आहे. निवृत्त शिक्षकांची थकित रक्कम मिळत नसल्याने इराणी (Smriti Irani) यांनी थेट शिक्षणाधिकाऱ्यांना फोन केला. पण समोरून अधिकाऱ्यांकडून त्रुटी सांगण्यास सुरूवात केल्याने इराणींनी (Smriti Irani) त्यांना चांगलेच फैलावर घेतले. आजच्या आज सगळी प्रलंबित काम पूर्ण करा, असा दमच त्यांनी भरला. (Smriti Irani)

इराणी (Smriti Irani) तीन दिवसांच्या अमेठी दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी निवृत्त शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी त्यांची भेट घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर इराणी (Smriti Irani) यांनी थेट संबंधित शिक्षण निरीक्षकांना फोन केला. त्यावर निरीक्षकांनी निवृत्त शिक्षकांच्या कागदपत्रांतील त्रुटी नियम सांगण्यास सुरूवात केली. हे पाहून इराणी (Smriti Irani) यांनी सुरूवातीला सौम्य शब्दांत त्यांना आजच्या आज प्रलंबित काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. (Smriti Irani)

(हेही वाचा – Panvel : नेपाळमध्ये अडकलेल्या ‘त्या ५८ प्रवाशांसाठी’ देवेंद्र फडणवीस ठरले देवदूत)

निरीक्षकाला सुनावले खडे बोल 

शिक्षण निरीक्षक ऐकत नसल्याचे पाहून इराणी (Smriti Irani) यांनी, मी जर सर्व कागदपत्रे जमा करणे, नियम दाखवणे सुरू करू का. तुम्ही जर जाणीवपूर्वक वेतन देत नसाल, हे स्पष्ट झाले तर? असे म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला. तुम्ही मला दहा मिनिटे सुनावत असाल तर शिक्षकांचे किती हाल करत असाल, असा उलट प्रश्न इराणींनी (Smriti Irani) केला. खासदारांकडून फोन आल्यानंतर तुम्ही शिक्षक किती खराब आहेत हे सांगत आहात. त्यांचे किती हाल करत असाल. ७२ वर्षाचे निवृत्त शिक्षक माझ्यासोबत आहेत. माझी विनंती आहे, त्यांना त्यांचे अधिकार द्यावेत. (Smriti Irani)

योगी सरकारही (Yogi Sarkar) शिक्षकांना अधिकार देत आहे. तुम्ही अडथळा बनू नका. ही अमेठी आहे, इथे प्रत्येक नागरिक कागदपत्रांसह खासदारापर्यंत पोहचू शकतात, अशा कडक शब्दांत इराणी (Smriti Irani) यांनी निरीक्षकाला सुनावले. तसेच आजच्या आज प्रलंबित कामे पूर्ण करण्यासही त्यांना सांगितले. (Smriti Irani)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.