ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत; राज यांच्या भूमिकेला Uddhav Thackeray यांचा सकारात्मक प्रतिसाद

663
ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत; राज यांच्या भूमिकेला Uddhav Thackeray यांचा सकारात्मक प्रतिसाद
  • प्रतिनिधी

महाराष्ट्राच्या राजकारणात बहुप्रतिक्षित घडामोडीला सुरुवात झाली आहे. शिवसेना (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेतला असून, उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत एक अट ठेवली आहे. महापालिका निवडणुकीच्या टप्प्यावर ही चर्चा तीव्र झाली आहे.

(हेही वाचा – IPL 2025, RCB vs PBKS : रजत पाटीदारने मोडला सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम)

दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या अस्मितेसमोर आमच्यातील वाद क्षुल्लक आहेत. एकत्र येणे कठीण नाही. मी अहंकार बाजूला ठेवून मराठी लोकांनी एकच पक्ष काढावा, असे मानतो. शिवसेना सोडताना अनेक आमदार-खासदार माझ्यासोबत येण्यास तयार होते, पण मी आयत्या पिठावर रेघोट्या मारणारा नाही.” उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तरात सांगितले, “आमच्यात भांडणे नव्हतीच. किरकोळ वाद मिटवून मी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार आहे. पण माझी अट आहे – भाजपासोबत जायचे की माझ्यासोबत, हे ठरवा. या चोरांना कळत-नकळत पाठिंबा देऊ नका, ही शिवरायांची शपथ घ्या.”

(हेही वाचा – उद्धव आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर मंत्री Nitesh Rane यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, स्वत:च्या अस्तित्वासाठी…)

गेल्या पाच-सहा वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. यापूर्वीही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. शिवसेना उबाठा नेते संजय राऊत म्हणाले, “भाजपाला शिवाजी महाराज आणि बाळासाहेबांचे नाव नष्ट करायचे आहे. अशा वेळी ठाकरे बंधूंची साद-प्रतिसादाची भूमिका स्वागतार्ह आहे. राज ठाकरेंची सकारात्मक भूमिका नाकारण्याचा करंटेपणा आम्ही करणार नाही.” महाराष्ट्राच्या कल्याणासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरेल, अशी अपेक्षा आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.