ठाकरे गटाला धक्का: Tejasvee Ghosalkar यांचा शिवसेनेतून राजीनामा, दहिसरमध्ये बंडखोरी!

196
मुंबई प्रतिनिधी

Tejashwi Ghosalkar : शिवसेना उबाठाला (Shivsena UBT) मुंबईतील दहिसर विधानसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेविका आणि महिला दहिसर विधानसभा प्रमुख तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षातील स्थानिक नेतृत्वाविरोधातील नाराजीमुळे आपल्या पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. घोसाळकर यांनी विभागप्रमुख उदेश पाटेकर आणि महिला विभाग संघटक शुभदा शिंदे यांना वैयक्तिक कारणांचा हवाला देत राजीनामा सादर केला. मात्र, स्थानिक नेत्यांच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांनी वारंवार व्यक्त केलेल्या नाराजीला पक्षाकडून प्रतिसाद न मिळाल्याने हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. (Tejasvee Ghosalkar)

(हेही वाचा – Pahalgam Terror Attack मधील दहशतवाद्यांवर 20 लाखांचे बक्षीस जाहीर; पोलिसांनी लावले पोस्टर्स)

तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनाम्यात पक्षप्रमुख आणि कार्यपद्धतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली, पण स्थानिक गटबाजीमुळे त्या नाराज होत्या. दहिसर हा ठाकरे गटाचा बालेकिल्ला असताना, हा राजीनामा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) पार्श्वभूमीवर पक्षासाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. उच्च न्यायालयाने चार महिन्यांत महापालिका निवडणुका घेण्याचे निर्देश दिल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचवेळी ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना घोसाळकर यांच्या बंडखोरीने उत्तर मुंबईत पक्षाला धक्का बसला आहे.

(हेही वाचा – J&K terrorist encounter: ऑपरेशन सिंदूरच्या दणक्यानंतर काश्मीरच्या शोपियांमध्ये चकमक, १ दहशतवादी ठार)

मातोश्रीवरून तातडीने पावले उचलली गेली असून, घोसाळकर यांना चर्चेसाठी बोलावले आहे. पक्ष डॅमेज कंट्रोलच्या प्रयत्नात आहे. सूत्रांनुसार, भाजपाकडून घोसाळकर यांना ऑफर मिळाल्याची शक्यता आहे, ज्यामुळे ठाकरे गटाची चिंता वाढली आहे. विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई असलेल्या तेजस्वी यांच्या या पावलाने पक्षांतर्गत असंतोष उफाळण्याची भीती आहे. घोसाळकर पुढे काय करतात आणि ठाकरे गट या संकटावर कशी मात करतो, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.