Shivsena UBT : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam terror attack) येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकारने दिल्ली येथे सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या हल्ल्यात निष्पाप २६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, भारताने पाकिस्तानची पूर्तता कोंडी केलेली आहे. भारताने पाकिस्तानवर काही निर्बंध लादल्यानंतर थयथयाट झालेल्या पाकनेही प्रत्युत्तर म्हणून काही निर्णय जाहीर केले. या भ्याड दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशभरातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीत सर्वपक्षीय नेत्यांची एक महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. परंतु, या बैठकीला शिवसेना उबाठाचे (Shivsena UBT) नेते गैरहजर राहिले असल्याची माहिती मिळाली आहे. (Shivsena UBT)
शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत ह्यांनी संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू ह्यांना पत्र लिहून संसदीय स्थायी समितीच्या अधिकृत शिष्टमंडळासोबत देशातील विविध भागांत दौऱ्यावर असल्यामुळे सरकारने आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीस वैयक्तिकरित्या उपस्थित राहणे शक्य नसल्याचे कळविले.… pic.twitter.com/gVK8HqbERy
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) April 24, 2025
मिळलेल्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने (Ministry of External Affairs) अनेक देशांच्या राजदूतांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांची भेट घेतली आणि घडामोडींची सविस्तर माहिती दिली. दरम्यान या सर्वपक्षीय बैठकी पूर्वी शिवसेना उबाठा पक्षाचे लोकसभा खासदार अरविंद सावंत यांनी संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांना कळवले की, ते बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. तसेच या भ्याड, द्वेषपूर्ण हल्ल्याविरुद्धच्या प्रत्येक निर्णयात आणि कारवाईत त्यांचा पक्ष सरकारसोबत उभा असल्याचे सावंत म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. दुसरीकडे, शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे बैठकीत त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधित्व करतील. त्याच वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बिहार दौऱ्यामुळे जनता दल (युनायटेड) नेते नितीश कुमार बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत. पण त्यांनी सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याची घोषणाही केली आहे.
(हेही वाचा – Pahalgam Attack वर पाकिस्तानी क्रिकेटपटुचा घरचा अहेर)
पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट
मंगळवारी २२ एप्रिलला पहलगाममधील बैसरन कुरणात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २६ भारतीय नागरिक आणि एका नेपाळी नागरिकाचा मृत्यू झाला. इतर अनेक जण जखमी झाले. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान हुतात्मा झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. सरकार आणि राजकीय पक्ष या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आहेत. सर्वजण दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे लढण्याबद्दल बोलत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community