शिवसेना ठाकरे गट जम्मू विधानसभेच्या निवडणुका लढवणार; राऊतांनी केले जाहीर

115

शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका (Jammu Assembly Election) लढवणार असल्याचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी जाहीर केले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो (Bharat Jodo) यात्रेत सहभागी होण्यासाठी राऊत जम्मूत गेले असता बोलत होते. तसेच काश्मिरी पंडितांना न्याय देण्याचे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान राहुल गांधींनी सावरकरांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतरही राऊत यात्रेत सहभागी झाले. त्यामुळे सावरकरप्रेमींमधून नाराजी व्यक्त होत आहे.

राहुल गांधी यांचे नेतृत्व तळपताना दिसतंय!

जम्मूतून संजय राऊत म्हणाले की, ‘देशात काँग्रेसला वगळून विरोधी पक्षांची आघाडी होऊच शकत नाही. एखाद्या पक्षाची भूमिका मांडण्याचा किंवा विरोध करण्याचा प्रश्न नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. देशातील महत्त्वाचा पक्ष आहे. राहुल गांधी यांचे नेतृत्व तळपताना दिसत आहे. लोकं त्यांना स्वीकारत असल्याचेही राऊत म्हणाले.’

देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागली!

एकंदरीत तुम्ही पाहिले असेल तर भारत जोडो यात्रेची चांगली वातावरण निर्मिती आहे. पक्ष म्हणून नाही पण देशात चांगला संदेश जात आहे. पठाणकोटला हजारो तरुण मशाली घेऊन निघाले होते. मशाली काय काँग्रेसचे चिन्ह नाही. ते शिवसेनेचं चिन्ह आहे. मलाही भरून आले. देश जागवण्यासाठी सर्वांना हातात मशालच घ्यावी लागत असल्याचेही राऊत म्हणाले.

(हेही वाचा – शिवसेना ठाकरे गटाच्या वाघिण, फायरब्रँड नेत्या नाराज)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.