‘किरीट का कमाल’ म्हणत राऊतांचा नवा ‘बॉम्ब’! NSEL घोटाळ्याचा उल्लेख करत सोमय्यांवर हल्लाबोल

84

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. 2013 मध्ये नॅशनल स्पॉट एक्सचेंजमध्ये (NSEL Scam) 5600 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. यामध्ये तब्बल 13 हजार गुंतवणूकदारांचे पैसे अडकले होते. या घोटाळ्यात ज्या कंपनीची चौकशी झाली त्याच कंपनीकडून किरीट सोमय्यांना लाखो रुपये मिळाल्याचा नवीन आरोप संजय राऊतांनी केला आहे.

काय केले राऊतांनी सोमय्यांवर आरोप?

राऊत आणि सोमय्यांविरोधात ट्विटवर वॉर सुरू असताना बुधवारी संजय राऊत यांनी सोमय्या यांच्याशी निगडीत युवक प्रतिष्ठानवर सलग तिसऱ्यांदा आरोप केल्याचे समोर आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून संजय राऊत दररोज सकाळी ट्विट करून सोमय्यांवर हल्लाबोल करतात. किरीट सोमय्यांनी आरोप केल्यानंतर ईडी ज्या कंपन्यांची चौकशी करतेय. त्यानंतर या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांना पैसे जातात, असे गंभीर आरोप राऊत करत आहेत.

(हेही वाचा – मालक होताच मस्क यांची घोषणा; डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील Twitter बंदी हटविणार!)

तीन दिवसांपासून त्यांनी याप्रकरणी वेगवेगळ्या कंपन्यांची नावे किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानसोबत जोडली आहेत. राऊतांनी बुधवारी देखील NSEL घोटाळ्याप्रकरणी सोमय्यांवर आरोप केले आहेत. NSEL मध्ये 5600 कोटींचा घोटाळ्या प्रकरणी सोमय्यांनी ईडी चौकशीची मागणी केली होती. त्यानतंर मोतीलाल ओसवाल कंपनीची चौकशी झाली. स्वतः किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनीच्या शिपायांच्या घरी गेले. तिथे जाऊन तमाशा केला. मात्र, त्यानंतर 2018-19 मध्ये किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओस्वाल कंपनीकडून लाखो रूपयांची देणगी त्यांच्या युवक प्रतिष्ठान संस्थेसाठी घेतले, असे गंभीर आरोप राऊतांनी केले आहेत.

काय केले राऊतांनी ट्वीट

“किरीट का कमाल: 3. किरीट सोमय्या यांनी NSEL ची 5600 कोटी शेअर्सच्या घोटाळ्यासंदर्भात ईडीकडे चौकशीची मागणी केली. मोतीलाल ओसवाल कंपनीची याप्रकरणी ED ने चौकशी केली. स्वत: किरीट सोमय्या चौकशीसाठी कंपनी शिपायांच्या घरी गेले होते. तमाशा केला. 2018-19 असे दोन वर्ष सोमय्याने मोतीलाल ओसवालकडून लाखो रुपये त्याच्या युवाक प्रतिष्ठानसाठी घेतले”, असं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.