“बंड करून ९ महिने झाले आता आम्हाला विसरा… नव्याने पक्षबांधणी करा”, गुलाबराव पाटील यांचा ठाकरेंवर निशाणा

72

आदित्य ठाकरेंनी अलिकडेच एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यावर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपास सुरुवात झाली आहे. या बंडाबाच्या गौप्यस्फोटावर शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

( हेही वाचा : मराठी भाषेचे सर्वंकष धोरण लवकरच जाहीर करणार, केसरकरांनी दिली माहिती)

“आतातरी तुम्ही आम्हा लोकांना विसरुन जा…”

माध्यमांनी आदित्य ठाकरेंच्या बंडाविषयी आमदार गुलाबराव पाटील यांना प्रश्न केला असता ते म्हणाले, “९ महिन्यांपासून तुम्ही बंड केले हेच ऐकवताय, लग्न झाल्यावर ९ महिन्यात अपत्य सुद्धा होते, आतातरी तुम्ही आम्हा लोकांना विसरुन जा. आता त्या गोष्टींवर बोलण्यापेक्षा त्यांनी नव्याने पक्षबांधणी केली पाहिजे. नवे सरकार कसे येईल याकडे लक्ष दिले पाहिजे आता तेच तेच ऐकून लोक सुद्धा कंटाळले आहेत अगदी टीव्ही बघायला पण कंटाळलेत.”

पुढे ते म्हणाले, “आता राज्याचे काही बघणार की नाही? एखाद्या घरात तरुणाचा मृत्यू झाला तरी लोक काही दिवसात विसण्याचा प्रयत्न करतात परंतु हे लोक ९ महिन्यापासून तेच घेऊन आहेत.” असा आरोप गुलाबराव पाटलांनी केला आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आदित्य ठाकरे एक दिवसाच्या हैदराबाद दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी एकनाथ शिंदेच्या बंडाबाबत गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, “शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी एकनाथ शिंदे मातोश्रीवर आले होते, ते रडायला लागले म्हणाले की, भाजपसोबत हातमिळवणी करा अन्यथा ते आम्हाला जेलमध्ये टाकतील” यावरच शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.