Shiv Sena Vardhapan Din : ‘तुमचा वर्धापन दिन आज नाहीच!’; शिवसेनेचा व्यंगचित्रातून शिवसेना उबाठावर हल्लाबोल

117
Shiv Sena Vardhapan Din : 'तुमचा वर्धापन दिन आज नाहीच!'; शिवसेनेचा व्यंगचित्रातून शिवसेना उबाठावर हल्लाबोल
  • प्रतिनिधी

शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन साजरा होत असतानाच, या ऐतिहासिक दिवशी शिवसेना उबाठानेही आपला वर्धापन दिन साजरा करण्याची घोषणा केली. मात्र याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने “तुमचा वर्धापन दिन आज नाहीच” अशा शीर्षकाने एक खुसखुशीत व्यंगचित्र प्रसिद्ध करुन उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना उबाठावर तिरकस हल्ला चढवला आहे. (Shiv Sena Vardhapan Din)

शिवसेनेच्या अधिकृत सोशल मीडियावरून गुरुवारी प्रसारित करण्यात आलेल्या पत्रकात व व्यंगचित्रात म्हटले आहे की, “खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंनी १९६६ साली स्थापन केली होती, आणि तिचा वारसा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चालवत आहेत.” याच वेळी, “उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाठा ही १० ऑक्टोबर २०२२ रोजी नवीन नोंदणीकृत संघटना असून निवडणूक आयोगाने त्यांना नवीन पक्ष नाव आणि चिन्ह दिले आहे, त्यामुळे त्यांचा वर्धापन दिन आज कसा?” असा बोचरा सवाल व्यंगचित्रातून विचारण्यात आला आहे. (Shiv Sena Vardhapan Din)

(हेही वाचा – Monsoon Updates : कोकण व घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा! मुंबईसह रायगड, रत्नागिरी, घाट परिसराला ऑरेंज अलर्ट)

या व्यंगचित्रात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे गोंधळलेले आणि विकिपीडियावर आपल्या पक्षाची स्थापना तारीख शोधताना दाखवले असून, “आज वर्धापन दिन का साजरा करतोय?” असा उपरोधिक सूर आहे. दरम्यान, शिवसेनेचा ५९ वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात वरळीतील एनएससीआय डोम येथे पार पडत आहे. राज्यभरातून लाखो शिवसैनिकांनी मुंबईत धाव घेतली असून, कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी होत आहे. (Shiv Sena Vardhapan Din)

यावर प्रतिक्रिया देताना शिवसेनेने “खरी शिवसेना आम्हीच, उर्वरित केवळ शिवसेना उबाठा आहे” असा सूचक टोलाही लगावला आहे. दुसरीकडे, शिवसेना उबाठाकडून अद्याप यावर अधिकृत उत्तर मिळाले नसले तरी सोशल मीडियावर यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. या राजकीय टोला–टोलीमुळे मुंबईच्या राजकारणात वर्धापन दिनाच्या दिवशीही जोरदार धग जाणवत आहे. खासकरून पावसाळ्यातही या व्यंगचित्रामुळे वातावरण अधिकच तापले आहे. (Shiv Sena Vardhapan Din)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.