-
खास प्रतिनिधी
काश्मीरमधील पर्यटकांना स्थानिकांनी जी मदत केली ती विसरता येणार नाही, असे सांगून शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत हे मुस्लिम अतिरेक्यांची तळी का उचलून धरत आहेत, अशा भावना सर्वसामान्यांमध्ये व्यक्त केल्या जात आहेत.
४ पैकी दोन अतिरेकी स्थानिक
पहलगाम (Pahalgam) येथे २२ एप्रिल २०२५ या दिवशी दुपारी पाक अतिरेक्यांनी धर्म विचारत हिंदू पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. त्यातील ४ पैकी दोन अतिरेकी हे स्थानिक होते, अशा बातम्या चॅनलवर प्रसिद्ध होत आहेत. मात्र, गुरुवारी २४ एप्रिल २०२५ या दिवशी सकाळी पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हणाले, “काश्मीरमधील पर्यटकांना स्थानिकांनी जी मदत केली ती विसरता येणार नाही.”
(हेही वाचा – World Malaria Day 2025 : हिवताप मुक्त मुंबईसाठी फोकाय बेस्ड १-३-७ स्ट्रॅटेजी काय आहे? जाणून घ्या)
हल्ल्याचा व्हिडिओ काढला नाही
ज्यावेळी अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर हल्ला केला त्यावेळी एकाही स्थानिकाने या हल्ल्याचा व्हिडिओ काढला नाही. ज्या स्थानिक मुसलमानांनी मदत केली, असे म्हणतात, त्यांनी घटना घडत होती, तेव्हा मदत केली नाही. हल्ला झाला त्या ठिकाणी जवळपास १,५०० स्थानिक व्यवसाय करणारे उपस्थित असताना कोणी हिंदू पर्यटकांच्या मदतीला का नाही धावून गेला, असे अनेक प्रश्न विचारले जात असताना संजय राऊतांना स्थानिकांचा पुळका का येत आहे? अशी शंका समाजमाध्यमावर व्यक्त केली जात आहे.
मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण
गेल्या लोकसभेला (२०२४) महाविकास आघाडी आणि शिवसेना उबाठाला मुस्लिम मते मिळाली आणि महाविकास आघाडीला भरघोस यश मिळाले. राज्यात ४८ पैकी ३० जागा मिळाल्या तर भाजपा नेतृत्वाखालील महायुतीला १७ जागांवर यश मिळाले. या निवडणुकीत मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण झाल्याचे अनेक मतदारसंघांच्या निकालावरून स्पष्ट होते. तेव्हापासून शिवसेना उबाठाने मुस्लिम समाजाची बाजू घेण्यास सुरुवात केली असून उद्धव ठाकरे म्हणजे ‘मुस्लिमहृदयसम्राट’ अशी उपरोधिक टीकाही समाजमाध्यमावर यापूर्वी झाली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community