-
प्रतिनिधी
“कोरोना काळात मुंबईत ११ हजार मृत्यू झाले, त्याला शिवसेना (उबाठा) जबाबदार आहे,” असा आरोप भाजपा आमदार राम कदम (Ram Kadam) यांनी विधानसभेत केला. राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना ते बोलत होते.
“कोरोना काळात सरकार जबाबदार”
राम कदम (Ram Kadam) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळातील निर्णयांवर जोरदार टीका केली. “त्या वेळी सरकार जबाबदार होते. मुख्यमंत्री सहायता निधी उद्धव ठाकरे यांनी का बंद केला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
(हेही वाचा – Shiv Sena मंत्र्याने आदित्य ठाकरेंना भर सभागृहात सुनावले!)
“पालिकेच्या निधीवर भ्रष्टाचार”
मुंबईतील रस्त्यांच्या कामावर टीका करताना ते म्हणाले, “शिवसेना उबाठाच्या पालिकेने वर्षानुवर्षे डांबराचे रस्ते केले कारण त्यातून पैसे खायचे होते. मात्र, आता या सरकारने मुंबईत सिमेंट रस्ते बांधण्यास सुरुवात केली आहे.”
“कोस्टल रोडवरही भ्रष्टाचार?”
“कोस्टल रोड ही संकल्पना देवेंद्र फडणवीस यांची होती, मात्र उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या बाजूची मोकळी जागा कोणाला द्यायची आहे?” असा आरोप त्यांनी केला.
(हेही वाचा – Budget Session 2025 : वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीती, साखळी कुंपणासाठी २०० कोटींचा निधी मंजूर)
“मुंबईतील पाणी टंचाईलाही जबाबदार”
राम कदम (Ram Kadam) यांनी मुंबईतील पाणीपुरवठा समस्येवरही शिवसेना उबाठावर निशाणा साधला. “मुंबईला पाणी मिळत नाही, यासाठी शिवसेना उबाठा जबाबदार आहे,” असे त्यांनी विधानसभेत ठणकावले.
विधानसभेतील भाजपा आमदारांच्या या आरोपांवर शिवसेनेची काय प्रतिक्रिया असेल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community