गेल्या ९ ते १० दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या सत्ता संघर्ष गुरूवारी संपला. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सेनेविरोधात बंड केला. दरम्यान, या बंडानंतर राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आणि गुरूवारी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केली. गुरूवारीच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. या नंतर राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी फेसबुक पोस्ट करत शिंदेंकडे मोठी मागणी केल्याचे दिसले.
शपथविधी सोहळ्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिंदे आणि फडणवीसांना शुभेच्छा दिल्यात. राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भावी वाटचालीस शुभेच्छा. आपल्या हातून महाराष्ट्रामध्ये चांगले काम होवो, ही सदिच्छा!, असे ट्विट शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना भावी वाटचालीस शुभेच्छा !
— Uddhav Thackeray (@uddhavthackeray) June 30, 2022
दिघेंच्या पुतण्याने केली ‘ही’ मोठी मागणी
उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छाला अनुसरूनच आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांनी विधीमंडळात मंजूर केलेल्या शक्ती विधेयकास राष्ट्रपतींकडून मान्यता व मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा. अशी मोठी मागणी केली आहे.
काय म्हणाले केदार दिघे?
महाराष्ट्र माजी ऊद्धवसाहेबांनी आपणांस शुभेच्छा दिल्या आहेतच. माझ्याकडून एकनाथ शिंदे आपणांस हार्दिक शुभेच्छा… देवेंद्र फडणवीस विधीमंडळात मंजूर केलेल्या शक्ती विधेयकास राष्ट्रपतींकडून मान्यता व मराठी भाषेला अभिजात दर्जासाठी प्रयत्न करावा ही अपेक्षा केदार दिघे यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केली आहे.