Shiv Sena : दहिसरच्या शिंगाडेंचा शिवसेनेत लागला राँग नंबर; का परतल्या शिवसेनेत

34
Shiv Sena : दहिसरच्या शिंगाडेंचा शिवसेनेत लागला राँग नंबर; का परतल्या शिवसेनेत
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई 

अगदी काही दिवसांपूर्वी उत्तर मुंबईतील विभाग क्रमांक १ च्या उबाठा शिवसेनेच्या (Shiv Sena) विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंत काही दिवसांतच त्या स्वगृही परतल्या. परंतु, शिंगाडेंच्या प्रवेशानंतर शिवसेनेतील त्यांच्या राँग नंबरची जोरदार चर्चा होती. स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून प्रवेश न करता त्यांनी मंत्री सिद्धेश कदम यांच्या संपर्कात जाऊन शिवसेनेत प्रवेश केला होता आणि त्यांच्या संपर्क नॉट रिचेबल होताच त्या परतल्या. परंतु ज्या पाटेकर यांना कंटाळून त्यांनी शिवसेना उबाठा सोडली होती. त्याच पाटेकर यांच्यासोबत आता त्या कशा काम करणार असा प्रश्न दहिसरमधील शिवसेना उबाठाच्या शिवसैनिकांना पडू लागला आहे.

शिवसेना उबाठाच्या बोरीवली, दहिसर आणि कांदिवली या विभाग क्रमांक १ मधील महिला विभाग संघटक सुजाता शिंगाडे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केला होता. परंतु काही दिवसांमध्ये त्या शिवसेना उबाठामध्ये परतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या जाहीर पक्षप्रवेशात त्यांचे स्वागत केले. यावेळी रश्मी ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून प्रवेश स्वीकारला. यावेळी माध्यमांशी बोलतांना रश्मी ठाकरे यांचा उल्लेख माँसाहेब म्हणून करुन पहिले तीन दिवस मला रात्रीची झोपच लागली नव्हती त्यामुळे मी पक्षात परतलो. खरी शिवसेना ती नव्हेतर आपली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची असल्याचे त्यांनी सांगितले.

(हेही वाचा – ‘गाय’ चा फोटो दाखवून काँग्रेसच्या अर्फा खानमने दिल्या Bakra Eid च्या शुभेच्छा; अटकेची मागणी होताच पोस्ट डिलीट करत माफी मागितली)

परंतु शिंगाडे या शिवसेना उबाठाच्या विभाग संघटक असल्या तरी त्यांचे अस्तित्व प्रभाग क्रमांक १८ मध्येही नाही. प्रभाग क्रमांक १८ मधील संध्या दोशी यांच्याशी त्यांचे जुळत नसल्याचे आजवर अनेकदा दिसून आले. त्यामुळे संध्या दोशी यांनी शिवसेना उबाठा सोडून शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केल्यानंतर शिंगाडे यांनीही शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटत होते. शिंगाडे यांनी पक्ष सोडताना शिवसेना उबाठाचे विभाग क्रमांक १चे विभागप्रमुख उदेश पाटेकर यांना कंटाळून शिवसेनेत प्रवेश केल्याचे सांगितले होते.

पण शिंगाडे यांनी शिवसेनेच्या (Shiv Sena) नेत्या शितल म्हात्रे किंवा आमदार प्रकाश सुर्वे यांच्या संपर्कात जावून पक्षात प्रवेश न करता मंत्री सिद्धेश कदम यांच्या मदतीने ठाणे येथे जाऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु सिद्धेश कदम यांच्याशी संपर्क होत नसल्याने त्यांची पक्षात घुसमट होऊ लागली. ज्या नेत्यांना डावलून पक्षात प्रवेश केला त्या नेत्यांच्या संपर्कात जायची हिंमत नसल्याने अखेर शिंगाडे यांना स्वगृही परतण्याचा निर्णय घ्यावा लागला असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचा – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत Rahul Gandhi यांचा अपप्रचार; भाजपाने केला पलटवार, म्हणाले…)

दहिसर विधानसभेतील तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून ते कधीही कुठल्याही पक्षात प्रवेश करु शकतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर उदेश पाटेकर यांना शिवसेनेने (Shiv Sena) दरवाजे आधीच बंद करून ठेवलेले आहे. त्यामुळे पाटेकर वगळता सर्वंच निघून गेल्या दहिसर आणि मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील शिवसेना उबाठाची ताकद संपवली जात आहे. त्यामुळे दहिसरमधून घोसाळकर या अन्य पक्षात गेल्यास आमदारकीचे गाजर दाखवत शिंगाडे यांना दिले जाऊ शकतात तसेच त्यांना उपनेत्याही बनवल्या जाऊ शकतात, जेणेकरून त्यांना रोखणे सोपे जाईल असे बोलले जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.