आता राहुल शेवाळेंचा मनीषा कायंदेंवर पलटवार; ज्येष्ठ नेत्याला केले ब्लॅकमेल

178

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत दिशा सालियनच्या संशयित मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानंतर विधान परिषदेत ठाकरे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी राहुल शेवाळे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाची चौकशी करण्याची मागणी केली, त्यावर सभापती नीलम गोऱ्हे यांनी चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे आता राहुल शेवाळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मनीषा कायंदे यांची एका ज्येष्ठ नेत्याला फसवल्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली.

राहुल शेवाळे काय म्हटले पत्रात?

मनिषा कायंदे यांनी ज्येष्ठ नेत्याला धमकी देण्यासाठी गुंडांच्या टोळीचा वापर केला. एका ज्येष्ठ नेत्यासोबत २००७ साली लग्न करुनही २०११ साली लैंगिक शोषणाचा आरोप केला आणि संबंधित नेत्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप खासदार शेवाळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे. सोबतच घर, वडिलांचा दवाखाना आणि दुकानांचे फर्निचर कायंदे यांनी ज्येष्ठ नेत्याकडून करुन घेतल्याचा आरोप शेवाळे यांनी केला. मनिषा कायंदे यांच्यासंबंधित आरोप केलेले प्रकरण २०१० सालचे आहे, म्हणजेच या घटनेला १२ वर्ष उलटून गेली आहेत. आता शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पत्राची फडणवीस दखल घेणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(हेही वाचा Maharashtra Karnataka border dispute : कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांचे आणखी एक वादग्रस्त वक्तव्य)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.