शिंदे सरकार आठवड्यातून दोन वेळा का घेणार State Cabinet Meetings?

देशात येत्या दोन-अडीच महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभुमीवर राज्याला अर्थसंकल्पीय तरतूद खर्च करण्यासाठी पुढील साधारण तीन आठवड्यांचा वेळ आहे. या वेळेत अधिकाधिक लोकोपयोगी कामांना प्राधान्य देऊन मार्गी लावण्याचा सरकारचा मानस आहे.

204
Shinde Group : मुख्यमंत्री शिंदेंची अनुपस्थिती; तरीही शिंदे गटाची प्रचाराची ठरली रणनीती
  • सुजित महामुलकर

राज्यातील महायुती सरकार (Mahayuti Government) विविध कामांसाठी केलेली प्रस्तावित अर्थसंकल्पीय तरतूद (Proposed Budget Provision) खर्च व्हावी यासाठी लोकसभेची आचारसंहिता (Code Of Conduct) लागू होईपर्यंत आठवड्यातून दोन मॅरेथॉन मंत्रिमंडळ बैठका (Cabinet Meetings) घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. (State Cabinet Meetings)

तीन आठवड्यांचा वेळ

देशात येत्या दोन-अडीच महिन्यात लोकसभा निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभुमीवर राज्याला अर्थसंकल्पीय तरतूद खर्च करण्यासाठी पुढील साधारण तीन आठवड्यांचा वेळ आहे. या वेळेत अधिकाधिक लोकोपयोगी कामांना प्राधान्य देऊन मार्गी लावण्याचा सरकारचा मानस आहे. अन्यथा अशी कामे आचारसंहितेमुळे रखडली जाण्याची शक्यता असून पुढील आर्थिक वर्षात त्यासाठी वेगळी तरतूद करावी लागेल. (State Cabinet Meetings)

खर्च न झाल्यास विरोधकांना संधी

त्याचप्रमाणे अर्थसंकल्पीय तरतूद खर्च न झाल्यास विरोधकांना (Opposition Parties) विकासकामांवर (Development Work) सरकार खर्च करत नसल्याचा आरोप करण्याची आयती संधी मिळेल, असे एका मंत्र्याने सांगितले. (State Cabinet Meetings)

(हेही वाचा – Famous Singers In India : कोण आहेत भारतातील सर्वोत्तम गायक?)

विविध घोषणा

शिंदे-फडणवीस (Shinde-Fadanavis) सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प होता त्यामुळे यावर विरोधकांचेही बारीक लक्ष आहे. शेतकऱ्यांसाठी (Farmers) २९ हजार कोटी रुपयांच्या घोषणा करण्यात आल्या. महिलांसाठीही (Women) लेक माझी लाडकी यासह महिलांना राज्य परिवहन बसमध्ये ५० टक्के सवळतीत प्रवास (Concession), महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून आर्थिक मदत, निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसाहाय्य, मुंबईतील नवीन मेट्रो प्रकल्प (Mumbai Metro Project), तसेच युवकांसाठी, विविध जाती-धर्मासाठीही घोषणा करण्यात आल्या. (State Cabinet Meetings)

तरतूद मार्गी लावण्याचा प्रयत्न

अशा विविध घोषणांचा आढावा घेत असताना प्रास्ताविक आर्थिक तरतूद खर्च झाली नसल्याचे निदर्शनात आल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याला मंजूरी देऊन तरतूद मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्या मंत्र्याने स्पष्ट केले. (State Cabinet Meetings)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.