ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या शिष्टमंडळावरून काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य; Shashi Tharoor यांना वगळणार?

ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील माहिती जगभरात पोहोचविण्याकरिता केंद्र सरकारने शिष्टमंडळाची यादी घोषित केली. या यादीत काँग्रेस खासदार शशी थरूर(Shashi Tharoor) यांची निवड सरकारने केली असून त्यांच्या निवडीनंतर काँग्रेसकडून विरोध दर्शविण्यात आला होता. त्यामुळे आगामी विदेश दौऱ्याकरिता शशी थरुर(Shashi Tharoor) यांना काँग्रेस पाठविणार का?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. (Shashi Tharoor)

86

ऑपरेशन सिंदूरसंदर्भातील माहिती जगभरात पोहोचविण्याकरिता केंद्र सरकारने शिष्टमंडळाची यादी घोषित केली. या यादीत काँग्रेस खासदार शशी थरूर(Shashi Tharoor) यांची निवड सरकारने केली असून त्यांच्या निवडीनंतर काँग्रेसकडून विरोध दर्शविण्यात आला होता. त्यामुळे आगामी विदेश दौऱ्याकरिता शशी थरुर(Shashi Tharoor) यांना काँग्रेस पाठविणार का?, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. (Shashi Tharoor)

दरम्यान, केंद्र सरकारने बहुपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी थरूर यांची निवड केल्यामुळे काँग्रेस पक्षात विशेषतः गांधी परिवारातील निष्ठावंत नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात राष्ट्रवादाला समर्थन देणाऱ्यांविरोधात डावललं जात असेच म्हणावे लागेल. विशेष म्हणजे थरूर(Shashi Tharoor) यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबिया या देशांच्या प्रमुखांची भेट घेत ऑपरेशन संदर्भात माहिती देणार आहे.

(हेही वाचा Operation Sindoor : “संपूर्ण पाकिस्तान भारताच्या रेंजमध्ये” ; हवाई संरक्षण प्रमुख लेफ्टनंट जनरल सुमेर इवान यांचा पाकला कडक इशारा ! )

काँग्रेस हायकमांडला म्हणजेच गांधी कुटुंबाला खूश करण्यासाठी पक्षातील नेते राष्ट्रहिताला समर्थन देताना दिसून येत नसल्याचे समोर आले आहे. गांधी कुटुंबाला खूश करण्यासाठी नेत्यांकडून नाइलाजस्तव अपमानास्पद कृती होत असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे हे फक्त काँग्रेस पक्षातच घडू शकते जिथे राष्ट्रवादाच्या बाजूने उभे राहणाऱ्यांना पक्षात सापत्न वागणूक दिली जाते. नेत्यांना त्यांच्या विश्वासार्हतेमुळे, रेकॉर्डमुळे आणि ‘राष्ट्राला प्रथम स्थान’ देण्यामुळे बाजूला केले जाते. काँग्रेस हायकमांडला म्हणजेच गांधी कुटुंबाला खूश करण्यासाठी लोकांचा अपमान केला जातो, अशी धारणा आहे.

काँग्रेस नेते व खासदार शशी थरूर आता काँग्रेसमधील अनावश्यक रोषाचे बळी ठरले आहेत. ऑपरेशन सिंदूरबाबत दहशतवादाविरोधी भूमिका मांडण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच निमंत्रण स्वीकारले. जागतिक स्तरावर भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला स्पष्ट करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरचे स्पष्टीकरण देण्यासाठी खासदारांच्या बहुपक्षीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्यासाठी आमंत्रण दिले होते.

काँग्रेसने पाठविलेल्या यादीत कुणा-कुणाचा समावेश होता

केंद्र सरकारने काँग्रेस नेते व खासदार शशी थरूर यांना बहुपक्षीय शिष्टमंडळात सहभागी केले. यानिर्णयानंतर गांधी कुटुंबाशी निष्ठावंत असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते आता पक्षात संताप व्यक्त करत आहेत. खरंतर, काँग्रेस नाराज होण्याचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाने बहुपक्षीय शिष्टमंडळासाठी सुचवलेल्या नावांमध्ये थरूर यांचा समावेश नव्हता. काँग्रेस सरचिटणीस यांनी १७ मे रोजी सांगितले की, परदेशात जाणाऱ्या त्यांच्या चार खासदारांची नावे काँग्रेस “बदलणार नाही”. त्याच्या ‘एक्स’ पोस्टनंतर काँग्रेस पक्षाकडून पाठविण्यात आलेल्या यादीत आनंद शर्मा, गौरव गोगोई, नासिर हुसेन आणि राजा ब्रार यांचा समावेश करण्यात आला होता. या यादीत शशी थरुर यांना वगळण्यात आले होते.(Shashi Tharoor)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.