Sharad Pawar : शरद पवार निवृत्त नव्हे, तर प्रवृत्त झालेत

पवार निवृती झाले हा एक राज्यव्यापी कार्यक्रम बनवण्यात आला. जणू महाराष्ट्राला दुःख झाले आहे असे भासवण्यात आले. परंतु महाराष्ट्राच्या जनतेवर या निर्णयामुळे काहीही फरक पडलेला नाही

143
शरद पवार
  • जयेश शत्रुघ्न मेस्त्री

सोनी मराठीवर एक मजेदार कार्यकरम लागतो, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना हा कार्यक्रम आवडतो. दिवसभर थकून आल्यावर चिंता वाढवणार्‍या मालिका पाहण्याऐवजी हास्यजत्रा पाहण्याला अनेकांची पसंती असते असे सोशल मीडियावर आणि मित्रमंडळींशी चर्चा केल्यावर कळते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातही अशी जत्रा भरली आहे. पण ती हास्यजत्रा नसून ‘अश्रू जत्रा’ आहे, असे म्हणावे लागेल. मात्र या अश्रू जत्रेचे रुपांतर हास्य जत्रेत होताना दिसत आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार Sharad Pawar यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनामा दिला आणि अनेक कार्यकर्ते व नेते असे काही रडायला लागले की कोण वाईट प्रसंग यांच्यावर आला आहे. आता सर्वांनाच नवा अध्यक्ष कोण होईल याची चिंता लागली आहे. चाय बिस्कुट पत्रकारांना तर आश्चर्याचा धक्का बसला आहे. आता आपण कोणाची चाकरी करावी असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. खरं पाहता शरद पवार हे निवृत्त झाले नसून वेगळ्या पद्धतीने प्रवृत्त झाले आहेत म्हणून चाय बिस्कुटांनी चिंता करण्याची गरज नाही.

(हेही वाचा Sharad Pawar Resigns: ‘पक्षाच्या भवितव्यासाठी निर्णय घेतला’; शरद पवार यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद)

पवार निवृती झाले हा एक राज्यव्यापी कार्यक्रम बनवण्यात आला. जणू महाराष्ट्राला दुःख झाले आहे असे भासवण्यात आले. परंतु महाराष्ट्राच्या जनतेवर या निर्णयामुळे काहीही फरक पडलेला नाही. महाराष्ट्रातल्या जनतेचे पवारांवर इतके प्रेम असते तर त्यांच्या पक्षाला निवडणुकीत १०० आकडा सहज पार करता आला असता. हे पवारांना देखील ठाऊक आहे. मग इतका मोठा इव्हेंट बनवण्याची गरज काय? तर शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडले असले तरी त्यांनी भाजपविरोधी पक्षांचं आणि कार्यकर्त्यांचं लक्ष स्वतःकडे वेधलं आहे.

लक्षात घ्या, राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष नसतानाही ‘भारत जोडो’ यात्रा एका साध्या खासदाराच्या म्हणजे राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली पार पडली. कारण कॉग्रेसमध्ये गांधी कुटुंबाशिवाय पान देखील हलत नाही. त्याचप्रमाणे शरद पवार Sharad Pawar यांनी निवृत्ती घेऊन एकप्रकारे महाराष्ट्रातलं भाजप विरोधातलं सगळं राजकारण स्वतःकडे एकवटून घेतलं आहे. ते निवृत्त जरी झाले असले तरी महाविकास आघाडीतील पान त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय हलणार नाही. कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांत सांगायचं तर पवारांकडे आता महाविकासआघाडीचं रिमोट कंट्रोल आलेलं आहे. त्यामुळे सर्वात आधी रडणार्‍यांनी उगाच खोटे अश्रू गाळू नये. उलट निश्चिंत रहावे…

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.