संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार, नितेश राणेंच्या या दाव्यावर काय म्हणाले शरद पवार?

197
संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार, नितेश राणेंच्या या दाव्यावर काय म्हणाले शरद पवार?
संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करणार, नितेश राणेंच्या या दाव्यावर काय म्हणाले शरद पवार?

महाराष्ट्राच्या राजकारणात येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये आणखी एक भूकंप येणार आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनी किंवा १० जूनपूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतील, असा खळबळजनक दावा भाजप आमदार नितेश राणेंनी रविवारी, ७ मार्चला मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केला. त्यावर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी उत्तर दिले आहे.

शरद पवार काय म्हणाले?

शरद पवारांनी रविवार पंढरपुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी नितेश राणेंनी केलेल्या खळबळजनक दाव्यावर प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले की, कोणीतरी सिरियस बोलण्यात ज्यांचा लौकीक आहे अशा लोकांना उत्तर द्यावे. या पोरासोरांच्या वक्तव्यावर काय बोलणार.

(हेही वाचा – त्यांना जनतेनं नाकारलं…म्हणत अजित पवारांचं राज ठाकरेंच्या मिमिक्रीवर उत्तर)

‘उद्धव ठाकरे सापाला दूध पाजत आहेत’

तसेच नितेश राणे म्हणाले होते की, ‘शरद पवारांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत व्यासपीठावर संजय राऊतला बसायचे होते. त्यासाठी ते सातत्याने शरद पवारांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे संजय राऊत सिल्व्हर ओकवर गेले. उद्धव ठाकरे सापाला दूध पाजत आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर यांचे मनसुबे कळतील.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.