
-
प्रतिनिधी
काँग्रेसने ऑपरेशन सिंदूर संदर्भात संसदेत विशेष अधिवेशन बोलावण्याची जोरदार मागणी केली असली तरी, संरक्षण क्षेत्रातील निर्णयांची संवेदनशीलता लक्षात घेऊन अशा विषयांवर उघड चर्चेला मर्यादा असायला हव्यात, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले आहे.
(हेही वाचा – Cabinet Decision : एका क्लिकवर वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील ६ मोठे निर्णय)
सूत्रांच्या माध्यमातून पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले की, संसदेला विशेष अधिवेशन घेण्यास कोणतीही हरकत नाही. मात्र संरक्षणासारख्या राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत मुद्द्यांवर फक्त राजकीय फायद्यासाठी खुली चर्चा करणे योग्य नाही. संरक्षण विभागातील निर्णय हे देशाच्या सुरक्षेशी संबंधित असून ते अत्यंत गोपनीय स्वरूपाचे असतात. त्यामुळे या विषयावर कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.
(हेही वाचा – ठाकरे गटाला धक्का: Tejasvee Ghosalkar यांचा शिवसेनेतून राजीनामा, दहिसरमध्ये बंडखोरी!)
काँग्रेसने ऑपरेशन सिंधूरची माहिती जनतेसमोर आणण्यासाठी अधिवेशनाची मागणी केल्यामुळे एनडीएतील अंतर्गत मतभेद अधोरेखित होत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे. पवार (Sharad Pawar) यांचे वक्तव्य सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष इशारा मानले जात असून, त्यांनी स्पष्टपणे सुरक्षा आणि राजकारणातील सीमारेषा पाळण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community