Sharad Pawar On Palestine : ही कुजकी मानसिकता; पियुष गोयल यांची शरद पवारांवर टीका

पियुष गोयल म्हणाले, ''अनेक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी आणि भारताचे संरक्षणमंत्री राहिलेल्या व्यक्तीने दहशतवादाशी संबंधित मुद्द्यावर इतके बेजबाबदार वक्तव्य करणे योग्य नाही.''

112
Sharad Pawar On Palestine : ही कुजकी मानसिकता; पियुष गोयल यांची शरद पवारांवर टीका
Sharad Pawar On Palestine : ही कुजकी मानसिकता; पियुष गोयल यांची शरद पवारांवर टीका

इस्लायल-पॅलेस्टाईन युद्धाचे संपूर्ण परिणाम दिसू लागले आहेत. (Sharad Pawar On Palestine) इस्लामी देशांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली, तर अमेरिका, भारत या देशांनी इस्लायलची बाजू घेतली आहे. भारताने इस्लायलला अधिकृत पाठिंबा देऊनही काँग्रेसने पॅलेस्टाईनची बाजू घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही पॅलेस्टाईनच्या बाजूने भूमिका मांडली आहे. (Sharad Pawar On Palestine)

(हेही वाचा – Union Ministry Of Agriculture : रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी)

एका कार्यक्रमात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत होते. ”ज्या भागात युद्ध सुरू आहे, ती जमीन ही पॅलेस्टिनी लोकांची आहे. तिथे अतिक्रमण झाले आणि इस्रायल देश उदयाला आला. मला त्याच्या खोलात जायचे नाही. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंपासून, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी या सर्वांची पॅलेस्टाईनला मदत करण्याची भूमिका होती. दुर्दैवाने आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी (नरेंद्र मोदी) इस्रायलची बाजू घेतली आहे. ते करत असतांना त्या जमिनीचे मूळ मालक असलेल्या पॅलेस्टाईनकडे त्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यांची भूमिका काहीही असो; परंतु आपली म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका स्वच्छ असली पाहिजे”, असे शरद पवार या वेळी म्हणाले.

शरद पवारांच्या या भूमिकेवर भाजपाने टीका केली आहे. शरद पवार यांच्यासारखे ज्येष्ठ नेते इस्रायलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याबाबत भारताने घेतलेल्या भूमिकेबाबत अशा प्रकारचे निंदनीय वक्तव्य करतात, तेव्हा ते खूप अस्वस्थ करणारे असते. जगाच्या कुठल्याही भागात दहशतवादाचा निषेध केला पाहिजे, असे ट्विट पियुष गोयल यांनी केले आहे. (Sharad Pawar On Palestine)

पियुष गोयल म्हणाले, ”अनेक वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी आणि भारताचे संरक्षणमंत्री राहिलेल्या व्यक्तीने दहशतवादाशी संबंधित मुद्द्यावर इतके बेजबाबदार वक्तव्य करणे योग्य नाही. शरद पवार हे भारतावर दहशतवादी हल्ले झाले, तेव्हा झोपलेल्या आणि बाटला हाऊस एन्काउंटर घटनेवर अश्रू गाळणाऱ्या सरकारचे सदस्य होते. ही कुजकी मानसिकता थांबायला हवी. मला आशा आहे की, आता तरी शरद पवार हे आधी देशाचा विचार करतील.” (Sharad Pawar On Palestine)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.