Uddhav Thackeray vs Sharad Pawar : ‘होऊ दे चर्चा’ : ठाकरेंनी पवारांना डिवचले, थेट बारामतीत घेतला कार्यक्रम

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधला बेबनाव सातत्याने समोर येत आहे.

28
Uddhav Thackeray vs Sharad Pawar : 'होऊ दे चर्चा' : ठाकरेंनी पवारांना डिवचले, थेट बारामतीत घेतला कार्यक्रम
Uddhav Thackeray vs Sharad Pawar : 'होऊ दे चर्चा' : ठाकरेंनी पवारांना डिवचले, थेट बारामतीत घेतला कार्यक्रम

शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांमधला बेबनाव सातत्याने समोर येत आहे. आता तर ठाकरेंनी थेट पवारांवर कुरघोडी करीत बारामतीत कार्यक्रम घेतल्याने ‘काकां’नी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काकांची मनधरणी करायला ठाकरेंना सिल्वर ओकवर जावे लागले आहे.

उद्धव ठाकरेंनी ‘होऊ दे चर्चा’ नावाची एक नवी कन्सेप्ट आपल्या गटातील नेत्यांना आखून दिली आहे. प्रत्येक तालुक्यात जाऊन सर्वसामान्य नागरिकांत मिसळणे, राजकारणावर चर्चा घडवून आणणे आणि त्याद्वारे प्रचार करणे, असे त्याचे स्वरूप आहे. विशेषतः विरोधकांच्या मतदारसंघात हा कार्यक्रम घेण्याचे ठरले आहे. असे असताना, थेट पवारांच्या बारामतीत उबाठा गटाने कार्यक्रम घेतल्याने पवार गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

विरोधी पक्षांच्या मतदारसंघात मोर्चेबांधणी करण्याऐवजी मित्र पक्षांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाने घुसखोरी करण्यास सुरुवात केल्याने नाराजीची धार अधिक तीव्र आहे. यासंदर्भात पवार गटाच्या नेत्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधत आक्षेप नोंदवला. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या ठाकरेंनी थेट सिल्वर ओकवर धाव घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचे कळते.

(हेही वाचा – Drugs In Raigad : रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर अमली पदार्थांची २०० पाकिटे सापडली; पाकिस्तान कनेक्शन असण्याची शक्यता)

‘होऊ दे चर्चा’ संकल्पना आहे तरी काय?
  • उबाठा गटाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘होऊ दे चर्चा’ हा नवा उपक्रम राबविला जात आहे. बारामतीतून या उपक्रमाची सुरुवात आमदार सचिन अहिर यांच्या उपस्थितीत झाली. अहिर यांनी यानिमित्ताने बारामती तालुक्याचा दौरा केला.
  • वडगाव निंबाळकर येथे त्यांची सभा पार पडली. इंदापूर व दौंड तालुक्याचा दौरा ते करत आहेत. याविषयी अहिर म्हणाले की, केंद्र सरकारने मागील नऊ वर्षांत जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. उलट प्रत्येक विषयावर राजकारण केले आहे. त्यामुळे ‘होऊ दे चर्चा’च्या माध्यमातून पोलखोल अभियान आम्ही हाती घेतले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.