Sharad Pawar : पक्ष फुटलेला नसून अजूनही एकसंध आहे

Sharad Pawar : पक्ष फुटलेला नसून अजूनही एकसंध आहे

87
Sharad Pawar : पक्ष फुटलेला नसून अजूनही एकसंध आहे
Sharad Pawar : पक्ष फुटलेला नसून अजूनही एकसंध आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली नसून,अजूनही एकसंध आहे. काही जणांनी वेगळी भूमिका घेतली आहे. अजित पवार यांच्यासह १२ जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेला दावा हा चुकीचा असल्याचा आक्षेप शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या वतीने निवडणूक आयोगाकडे घेण्यात आला आहे.राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष फुटलेला नसून शरद पवार यांच्याच नेतृत्वाखाली पदाधिकारी काम करतात, असं सांगण्यात आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा काका-पुतण्यातील राजकारणाबद्दल चर्चा होत आहेत.

अजित पवार गटाच्या याचिकेसंदर्भात ७ सप्टेंबरला शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल करण्यात आलेलं आहे. त्यात म्हटलंय की, अजित पवार गटाच्या दाव्यांना कोणताही कायदेशीर अथवा भौतिक आधार नाही.वैयक्तिक स्वार्थासाठी काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे. पक्षामध्ये कसलीही फूट पडलेली नाही. अजित पवार यांनी घेतलेली भूमिका विरोधाभासी असल्याचंही उत्तरात म्हटलेलं आहे. या कारवाईवर पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शिक्कामोर्तब केल्याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. पक्षाची घटना, त्यात अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया, अध्यक्षांच्या निवडीसाठी लागणारा कालावधी या मुद्दय़ांचा पत्रात परामर्श घेण्यात आला आहे. अजित पवार यांनी कधी आणि कोणत्या अधिकारात बैठक बोलाविली, असा आक्षेप नोंदविण्यात आला आहे.

(हेही वाचा :ST Protest : महागाई भत्ता 42 टक्के करा; गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचा संपावर जाण्याचा इशारा)

बंडानंतर अजित पवार यांनी पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. पक्षाच्या बैठकीत आपली अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र अजित पवार यांनी निवडणूक आयोगाला सादर केले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादीवर दावा करीत घडय़ाळ हे चिन्ह मिळावे म्हणून अर्ज केला होता. या पत्राच्या आधारे निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला नोटीस बजाविली होती व त्यात अजित पवार यांच्या दाव्यावर उत्तर देण्यास सांगण्यात आले होते. यानुसार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वतीने निवडणूक आयोगाला सविस्तर पत्र सादर करण्यात आले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.