Sharad Pawar यांचा निवडणूक आयोगाला ई-मेल; पक्ष आणि चिन्हासाठी सुचवले तीन पर्याय

दरम्यान, शरद पवार गटाने बुधवारी आयोगाला ई-मेल करून पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह याचे तीन पर्याय सुचविले आहेत. यात नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी (एस) अशा तीन नावांचा पर्याय सुचविला आहे.

308
Sharad Pawar यांचा निवडणूक आयोगाला ई-मेल; पक्ष आणि चिन्हासाठी सुचवले तीन पर्याय

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढील वाटचालीसाठी हालचाल करायला सुरुवात केली आहे. शरद पवार (Sharad Pawar) गटाने आयोगाला पत्र लिहून पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह याबाबत तीन पर्याय सुचविले आहेत. (Sharad Pawar)

केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि घड्याळ निवडणूक चिन्ह यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांचा हक्क असल्याचा निकाल दिला होता. शरद पवार (Sharad Pawar) एक स्वतंत्र गट असल्याचे सांगत आयोगाने या गटाला पक्षाच्या नावाचे तीन पर्याय सुचविण्यास सांगितले होते. (Sharad Pawar)

(हेही वाचा – Meta to Label AI Images : एआयने बनवलेले व्हिडिओ आणि इमेज लेबल करणार फेसबुक)

ही नावे आणि चिन्हे सुचवली

दरम्यान, शरद पवार (Sharad Pawar) गटाने बुधवारी आयोगाला ई-मेल करून पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह याचे तीन पर्याय सुचविले आहेत. यात नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरद पवार, नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी (एस) अशा तीन नावांचा पर्याय सुचविला आहे. याशिवाय, पवार (Sharad Pawar) यांनी वटवृक्ष आणि उगवता सूर्य चिन्ह देण्याची मागणी केली आहे. यावर लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. (Sharad Pawar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.