Sharad Pawar Birthday : “पवार साहेबांना सांगितलं की घरी बसा, आराम करा पण ऐकतच नाहीत, काय करणार?” – अजित पवार

आजकाल मुले आपल्या वयस्कर आई-वडिलांना वेगळी वागणूक देत असल्याने सरकार कर्मचाऱ्यांच्या जुन्या निवृत्ती वेतनाबाबतच्या मागणीबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.

188
Supreme Court : घड्याळ चिन्ह अजित पवार गटच वापरणार

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शरद पवार (sharad pawar) यांचे पुतणे अजित पवार यांनी मंगळवार, १२ डिसेंबर रोजी पवारांच्या वाढदिवशी (birthday) आपल्या काकांना वय जास्त झाल्याने घरी बसून आराम करण्याचा सल्ला दिला. (Sharad Pawar Birthday)

अजित पवार यांनी मंगळवारी सकाळी नागपूर येथील पत्रकारांच्या सुयोग निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी अनौपचारिक चर्चा करताना आजकाल मुले आपल्या वयस्कर आई-वडिलांना वेगळी वागणूक देत असल्याने सरकार कर्मचाऱ्यांच्या जुन्या निवृत्ती वेतनाबाबतच्या (old pension) मागणीबाबत सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. (Sharad Pawar Birthday)

यावर एका पत्रकाराने प्रश्न केला की आजही आपले काका ८२ व्या वर्षी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत, तेव्हा मिश्किल हास्य करीत अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत सांगितले की, “आम्ही त्यांना घरी बसून आराम करा असं सांगितलं पण ते ऐकतंच नाहीत.” (Sharad Pawar Birthday)

(हेही वाचा – Winter Session 2023 : राज्यातील ढासळलेल्या आरोग्यव्यवस्थेविरोधात मविआचे प्रतिकात्मक आंदोलन)

शरद पवारांच्या भेटीबद्दल अजित पवार म्हणाले…

आज शरद पवार यांचा वाढदिवस असून आपण त्यांची भेट घेणार का? या प्रश्नावर अजित पवार यांनी थेट उत्तर देणे टाळले. ते म्हणाले, “राजकारण आणि नाती या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. सर्वसामान्य घरातही एखादया विषयावर एकमेकांच्या भूमिका पटत नाहीत.” (Sharad Pawar Birthday)

अजित पवार यांची चुलत बहिण आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या राजकीय भूमिकेबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर पवार यांनी “ती बहिण आहे त्यामुळे काही बोलणार नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. (Sharad Pawar Birthday)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.