१९४७ मध्ये देशाचे तीन तुकडे करण्यात आले आणि त्याच रात्री काश्मीरच्या भूमीवर पहिला दहशतवादी हल्ला झाला. पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या मदतीने मुजाहिदीनांच्या नावाखाली भारत मातेच्या एक भू-भागावर कब्जा केला. ही मालिका गेल्या ७५ वर्षांपासून सुरू आहे. पहलगामध्येही त्याचेच विकृत रूप होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी म्हटले आहे.
ते मंगळवारी गांधीनगर येथे जनतेला संबोधित करत होते. सरदार पटेलांची इच्छा होती, जोवर पीओके परत येत नाही, तोवर आपले सैन्य थांबायला नको. मात्र, सरदार पटेलांचे म्हणणे ऐकले गेले नाही आणि ते मुजाहिदीन, जे रक्त चाटून गेले होते, ती मालिका गेल्या ७५ वर्षांपासून सुरू आहे. पहलगामध्येही त्याचेच विकृत रूप होते. ७५ वर्षे आपण सोसले आहे आणि पाकिस्तान सोबत जेव्हा जेव्हा यद्धाची वेळ आली, तिनही वेळा भारताच्या सैन्य शक्तीने पाकिस्तानला धूळ चारली आणि पाकिस्तानला समजले की ते लढाईत भारतासोबत जिंकू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
सैन्य प्रशिक्षित दहशतवादी भारतात पाठवले जातात आणि निर्दोश नि:शस्त्र लोक मारले जातात आणि आपण सहन करत राहिलो. ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत मोदी म्हणाले, ६ मेच्या रात्री पाकिस्तानात जे मारले गेले, त्यांना स्टेट ऑनर देण्यात आला. त्यांच्या शवपेट्यांवर पाकिस्तानी झेंडे लावण्यात आले आणि तेथील सैन्याने त्यांना सलामीही दिली. यावरून स्पष्ट होते की, दहशतवादी कारवाया हे प्रॉक्सी वॉर नाही, तर तुमची (पाकिस्तानची) सुनियोजित युद्धनीती आहे. जर तुम्ही युद्ध करत असाल, तर तुम्हालाही त्याच पद्धतीने उत्तर मिळेल, असेही पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले.
Join Our WhatsApp Community