स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे लाल बाल पाल अर्थात पंजाबमधील लाला लजपतराय, महाराष्ट्रातील लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि पश्चिम बंगालमधील बिपीनचंद्र पाल हे ओळखले जातात. यातील पंजाब आणि बंगाल ही राज्ये विघटनवादी प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती गेली आहेत. आपणही सरकार निवडण्यात चूक केली तर महाराष्ट्रही त्याच वाटेवर जाऊ शकतो, असा धोक्याचा इशारा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर (Ranjit Savarkar) यांनी दिला आहे. ते म्हणाले की, वीर सावरकरांनी सांगितले होते, महाराष्ट्र हा भारताचा खड्ग आहे. कारण जेव्हा-जेव्हा भारतावर आक्रमणे झाली तेव्हा-तेव्हा महाराष्ट्र धावून आला आहे. अगदी पानिपतला लढायला पुण्यातून मराठे गेले होते. महाराष्ट्र देशाला वाचवत आला आहे. जर महाराष्ट्रावर आघात केला, महाराष्ट्र धर्म बुडवला तर देश बुडायला वेळ लागणार नाही.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४२व्या जयंतीनिमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे शौर्य, विज्ञान आणि स्मृतीचिन्ह पुरस्कार प्रदान सोहळा रविवार, २५ मे २०२५ या दिवशी सायंकाळी ७ वाजता स्मारकाच्या सावरकर सभागृहात अत्यंत दिमाखात संपन्न झाला. ४थी बटालियन, मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे लेफ्ट कर्नल अनिल अर्स (वीरचक्र) यांना स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार, आय.आय.टी. मुंबईचे उपसंचालक डॉ. मिलिंद अत्रे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञान पुरस्कार, तर डॉ. विजय सखाराम जोग आणि वैद्य चिंतामण नारायण साठे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याच्या कार्यात योगदान दिल्याबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृति पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हे पुरस्कार मुंबईचे भूतपूर्व पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी रणजित सावरकर (Ranjit Savarkar) बोलत होते.
…म्हणून परकीय आक्रमणे भारतावर होत राहिली
वीर सावरकरांचे एक वाक्य होते जर शस्त्रावर धर्माचे नियंत्रण नसेल तर शस्त्र पाशवी असते, हे आपण नुकतच बघितले, हे वाक्य पाकिस्तानला तंतोतंत लागू होते. आपले शस्त्रावर नियंत्रण असल्यामुळे आपण ऑपरेशन सिंदूरमध्ये अचूक मारा केला, त्यावेळी पाकिस्तानातील नागरिकांची हानी केली नाही. आम्ही युद्ध धर्म पाळला, आम्ही त्या धर्माचे शस्त्रावर नियंत्रण ठेवले. वीर सावरकरांचे दुसरे वाक्य असे होते, जर शस्त्राचा आधार धर्माला नसेल तर धर्म पांगळा होतो आणि हा आमच्या गेल्या काही शतकांचा इतिहास आहे. वीर सावरकरांनी जे ‘सहा सोनेरी पाने’ हे पुस्तक लिहिले त्यात सगळी तीच उदाहरणे आहेत. आमच्याकडून नेहमी सद्गुणांचा अतिरेक होतो, त्यामुळे परकीय आक्रमणे होत गेली. ग्रीक, कुश, अरब, तुर्क, अफगान, पठाण आले. यातील कुणी ना कुणी आमच्यावर आक्रमण केले आणि आमच्यावर राज्य केले. शेवटी छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले. पण आम्हाला जिंकल्यानंतर एक कुंभकर्णी झोप घ्यायची सवय आहे. मग पुन्हा आमचे लचके तोडले गेले. आजचा भारत हा अफगानिस्तापर्यंत विस्तारलेला होता. पण भारत आज तुटत तुटत कमी झाला आहे, असेही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.
शस्त्राला विज्ञानाची जोड दिली पाहिजे!
वीर सावरकरांचे आणखी एक वाक्य आहे की, ‘राष्ट्राच्या सीमा या कागदावर पेन्सिलने आखता येत नाहीत तर त्या प्रत्यक्ष शत्रूच्या छाताडावर बंदुकीच्या गोळीने आखायच्या असतात आणि हे आपण आता आपल्या सैन्याने परवा करून दाखवले आणि यासाठी आम्ही शौर्य पुरस्कार हा आवर्जून देत असतो. आमची आमच्या सैनिकांप्रती, वीरांप्रती कृतज्ञता आहे ती व्यक्त करत असतो. शस्त्र हे नित्यदिन बदलले पाहिजे. आपण आमचा शस्त्रांचा विकास थांबवला. पण छत्रपती शिवाजी महाराज याला अपवाद ठरले. त्यांनी स्वतःची तलवार युरोपियन सोडच्या धर्तीवर तयार केली. तोपर्यंत शस्त्रांचा विकासच झाला नाही. आपली सैन्यशक्ती अवचित राहायची असेल तर शस्त्राला विज्ञानाची जोड दिली पाहिजे. म्हणूनच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने सावरकर विज्ञान पुरस्कार देण्यास सुरुवात केली. आज क्रायोजेनिक तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला जात आहे. आता युद्ध हवाई युद्धापर्यंत सीमित राहिलेले नाही, थेट उपग्रह वर ठेवून सगळे सुरु राहणार आहे. शत्रराष्ट्राचा उपग्रह ताब्यात घेणे. त्यामुळे तंत्रज्ञानात प्रचंड फरक पडणार आहे, असेही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.
आर्थिक बहिष्काराचे शस्त्र उगारा
आज देशातील नागरिकांचेही देशकर्तव्य काय आहे. पाकिस्तानसोबत युद्ध होईल तेव्हा सीमेवर सैन्य आहेच, पण देशात अंतर्गत युद्ध सुरु आहे, याचे काय? आज बांगलादेशातील १० कोटीहून अधिक मुसलमान भारतात घुसले आहेत. मग तुम्ही ‘हे पोलिसांचे काम आहे’, असे म्हणणार का? ते रोजीरोटीसाठी येत आहेत. आज दादरच्या रस्त्यावर जे फेरीवाले आहेत ते बांगलादेशी मुसलमान आहेत. ते गावागावात पोहचले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांकडे एकच शस्त्र आहे. तुमच्या खिशातील पैसे. तुमच्या खिशातील पैसा बंगालदेशी घुसखोरांकडे जात आहे, त्यातून त्यांचा धंदा चांगला होतोय, त्या पैशाच्या जोरावर तो बांगलादेशातून आणखी माणसे आणतो. अनेक व्यापार, व्यवसाय हिंदूंच्या हातून गेले आहेत आणि इथला मुसलमान त्या बांगलादेशी घुसखोराला समर्थन देत आहे. कारण इस्लाममध्ये राष्ट्रभक्ती संकल्पनाच नाही, जर तुम्ही राष्ट्रभक्त असाल तर तुम्ही मुसलमान नाही, हे अगदी कुराणानुसार स्पष्ट म्हटले आहे. कारण त्यांच्यामध्ये इस्लाम हेच एक राष्ट्र आहे, बाकी सर्व जग इस्लाममय करणे हा त्यांचा शेवटचा उद्देश आहे. म्हणून आर्थिक बहिष्काराचे शस्त्र आपण जर वापरले नाही तर आपल्यासारखे मूर्ख आपणच असू. कारण आतूनच जर तुमचा देश पोखरून गेला, तर सीमेवर काय उरणार आहे? सैन्य हे तुमचे तेव्हापर्यंतच राहील, जोवर हे सरकार तुमचे राहणार आहे. त्यामुळे निष्ठेने मतदान करून चांगले सरकार आणणे ही तुमची जबाबदारी आहे. म्हणून मतदानाच्यावेळी योग्य बटण आपण दाबले नाही तर येणारे सरकार तुमचे राहणार नाही, पुन्हा सैन्यात मुसलमानांना आरक्षण येईल. स्वातंत्र्यपूर्व काळात सैन्यात जो मुसलमानांचा ६५ टक्के आणि हिंदूंचा ३५ टक्के सहभाग होता, त्याची पुनरावृत्ती होईल. त्यामुळे तुम्हाला दोन कामे करायची आहेत, एक बांग्लादेशींना पळवून लावण्यासाठी आर्थिक बहिष्कार टाकायचा आहे, त्यासाठी आम्ही ‘ओम प्रतिष्ठान’ द्वारा ‘ओम प्रमाणपत्र’ अभियान सुरु केले आहे. यात सेवा पुरवठादार, विक्रेते यांना आम्ही ओम प्रमाणपत्राने प्रमाणित करत आहोत. दुसरे ओम ग्राहक अभियानही सुरु केले आहे. जर आपण हिंदू ग्राहकांचे व्यासपीठ बनवले तर आपली एकजुटता निर्माण होईल, असेही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.
महाराष्ट्र बुडला, तर देश बुडायला वेळ लागणार नाही!
आज जर हे केले नाही तर महाराष्ट्रातील अशा १२० विधानसभेच्या जागा आहेत, त्यातील विजयाचे मताधिक्य २० हजार इतके आहे. पुढे हे बांगलादेशी महाराष्ट्रात आणखी संख्येने येतील आणि या जागाही तुम्ही पराभूत व्हाल. जर महाराष्ट्रात तुमचे सरकार नसेल तर स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे लाल, बाल, पाल अर्थात पंजाबमधील लाला लजपतराय, महाराष्ट्रातील लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि पश्चिम बंगालमधील बिपीनचंद्र पाल म्हणून ओळखले जातात. यातील पंजाब आणि बंगाल ही राज्ये विघटनवादी प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती गेली आहेत. आता महाराष्ट्रही जाईल. वीर सावरकरांनी सांगितले होते की, महाराष्ट्र हा भारताचा खड्ग आहे. कारण जेव्हा-जेव्हा भारतावर आक्रमणे झाली तेव्हा- तेव्हा महाराष्ट्र धावून आला आहे. अगदी पानिपतला लढायला पुण्यातून मराठे गेले होते. महाराष्ट्र देशाला वाचवत आला आहे. जर महाराष्ट्रावर आघात केला, महाराष्ट्र धर्म बुडवला, तर देश बुडायला वेळ लागणार नाही. महाराष्ट्र एकटा उरलेला आहे. त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागणार आहेत. बांगलादेशी घुसखोर व्यापाऱ्यांवर आर्थिक बहिष्काराचे शस्त्र उगारून खिशातील पैसा हिंदूंच्या हाती द्या आणि मतदान करताना ते निष्ठेने करा, हे नाही केले तर आपली परिस्थिती वाईट आहे. म्हणून आर्थिक बहिष्कारासाठी प्रचंड लोकांची गरज आहे. लक्षात ठेवा, वीर सावरकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती. आपण आपल्या शत्रूवर, बांगलादेशी घुसखोरांवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत. वीर सावरकरांना तेव्हाही अर्थनीतीचे महत्त्व ठाऊक होते. तीच नीती आपण वापरली नाही तर आपला विनाश निश्चित आहे आणि वापरली तर आपण आपल्या शत्रूवर मात करू, असेही रणजित सावरकर (Ranjit Savarkar) म्हणाले.
Join Our WhatsApp Community