Satyendar Jain यांच्या सीबीआय चौकशीला गृहमंत्रालयाची मंजुरी

दिल्ली सरकारचे दोन माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे जवळपास वर्षभरापासून तिहारमध्ये आहेत. तत्कालीन तुरुंग अधीक्षक राज कुमार यांच्यावर दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले सत्येंद्र जैन यांच्या सांगण्यावरून फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून १० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.

221
Satyendar Jain यांच्या सीबीआय चौकशीला गृहमंत्रालयाची मंजुरी

महाठग सुकेश चंद्रशेखर याच्याकडून १० कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी सत्येंद्र जैन (Satyendar Jain) यांच्याविरुद्ध सीबीआय चौकशीला गृह मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना यांनी फेब्रुवारी महिन्यात या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारस गृह मंत्रालयाकडे केली.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या बदल्यात राष्ट्रवादीला राज्यसभेचा पर्याय ?)

नेमकं प्रकरण काय ?

सुकेश चंद्रशेखर यांनी जैन (Satyendar Jain) यांच्यावर तिहार तुरुंगात असताना प्रोटेक्शन मनी म्हणून १० कोटी रुपये उकळल्याचा आरोप केला. सीबीआय तपासाला मंजुरी देताना नायब राज्यपालांनी हे प्रकरण आवश्यक कारवाईसाठी गृह मंत्रालयाकडे पाठवले होते. नायब राज्यपालांनी ९ फेब्रुवारी रोजी तिहार तुरुंगाचे माजी डीजी संदीप गोयल आणि तिहार तुरुंगाचे तत्कालीन अधीक्षक राज कुमार यांच्याविरुद्ध सीबीआय (Satyendar Jain) चौकशीला मंजुरी दिली होती. कोट्यवधी रुपयांची फसवणूक आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर यांनी दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहिले होते, ज्यात त्यांनी तुरुंगात सत्येंद्र जैन यांचेच सरकार चालवल्याचा आरोप केला होता. यासोबतच सीबीआयने दिल्लीचे माजी मंत्री सत्येंद्र जैन (Satyendar Jain) आणि माजी तुरुंग अधीक्षक राज कुमार यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे परवानगी मागितली होती.

(हेही वाचा – Rameshwaram Cafe Blast : रामेश्वर कॅफे स्फोटाच्या २ आरोपींचे फोटो जारी; माहिती देणाऱ्यांना १० लाखांचे बक्षीस)

मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन हे जवळपास वर्षभरापासून तिहार जेलमध्ये :

दिल्ली सरकारचे दोन माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन (Satyendar Jain) हे जवळपास वर्षभरापासून तिहारमध्ये आहेत. तत्कालीन तुरुंग अधीक्षक राज कुमार यांच्यावर दिल्ली सरकारमध्ये मंत्री असलेले सत्येंद्र जैन यांच्या सांगण्यावरून फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर यांच्याकडून १० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. राजकुमार हा तिहार तुरुंगातून सत्येंद्र जैन आणि संदीप गोयल कडून चालवल्या जाणाऱ्या खंडणी सिंडिकेटचा भाग असल्याचा आरोप आहे. (Satyendar Jain)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.