Satara Loksabha Election : साताऱ्यातील तिढाही कायम; भाजपच्या उदयनराजेंविरुद्ध उमेदवार देण्यावर अजित पवार गट ठाम

Satara Loksabha Election : अमित शाहांशी चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीला गेले आहेत, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुंबईत चर्चा होणार आहे.

127
Satara Loksabha Election : साताऱ्यातील तिढाही कायम; भाजपच्या उदयनराजेंविरुद्ध उमेदवार देण्यावर अजित पवार गट ठाम
Satara Loksabha Election : साताऱ्यातील तिढाही कायम; भाजपच्या उदयनराजेंविरुद्ध उमेदवार देण्यावर अजित पवार गट ठाम

लोकसभा निवडणुकीसाठी साताऱ्यात भाजपतर्फे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांच्या उमेदवारीची तयारी चालू आहे. उदयनराजेही कमळ चिन्हावरच निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. असे असूनही राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटानेही रिंगणात उतरण्यावर ठाम असल्याचे सांगितले. त्यामुळे नवा तिढा निर्माण झाला आहे. माढा मतदारसंघाचा तिढा अजून सुटलेला नसतांनाच हे नवे नाट्य आता चालू झाले आहे. (Satara Loksabha Election)

(हेही वाचा – PIB Fact Check : केंद्राच्या ‘फॅक्ट चेक’ला सर्वोच्च न्यायालयाचा लगाम; सर्वोच्च न्यायालयाकडून अधिसूचना रद्द)

उदयनराजे भोसले दिल्लीला

अमित शाहांशी चर्चा करण्यासाठी खासदार उदयनराजे भोसले दिल्लीला गेले आहेत, तर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही मुंबईत चर्चा होणार आहे. अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन नितीन पाटील इच्छुक आहेत. अजित पवार गट ही जागा भाजपला सोडण्यासाठी तयार नाही.

शरद पवार गटाकडूनही नाव निश्चित नाही

उदयनराजे व त्यांच्या समर्थकांना अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्याकडून अद्याप हिरवा कंदिल मिळत नसल्याने तेही संभ्रमात आहेत. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला ही जागा सुटली आहे. विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील त्यांचे सुपुत्र सारंग पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, पाटणचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्यासोबत शरद पवारांनी आतापर्यंत तीन बैठका घेतल्या आहेत. शरद पवार गटाकडूनही कोणाचे नाव निश्चित करण्यात आलेले नाही.

सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये कराड दक्षिण, कराड उत्तर, पाटण, सातारा जावळी, कोरेगाव, वाई महाबळेश्वर – खंडाळा हे विधानसभा मतदारसंघ येतात. साताऱ्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा मतदार अधिक संख्येने आहे. त्यामुळे उमेदवार निश्चित करून त्याला निवडून आणण्याचे मोठे आव्हान महायुतीसमोर राहणार आहे. (Satara Loksabha Election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.