“सरदार पटेल पीओकेसाठी आग्रही होते, पण…”; PM Narendra Modi यांचे मोठं विधान

564
PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. मंगळवारी २७ मे रोजी सकाळी त्यांनी गांधीनगर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) आणि भारताच्या लष्करी कारवाईची माहिती दिली. तसेच पाकव्याप्त जम्मू-काश्मीर (PM Modi PoK) ताब्यात घेण्यासाठी भारताचे पहिले गृहमंत्री सरदार पटेल आग्रही होते. जोपर्यंत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर भारताच्या ताब्यात येत नाही. तोपर्यंत लष्करी कारवाई थांबविण्यात येऊ नये, असे पटेल यांचे मत होते. पण त्यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (PM Narendra Modi)
(हेही वाचा – Bangladesh Yunus Government : स्थानिक पक्ष, लष्कराचा विरोध अशातच भारताविरोधात ओकली गरळ; मोहम्मद युनूस यांची खुर्ची धोक्यात?)
१९४७ साली झालेली भारताची फाळणी आणि काश्मीरवरून भारत-पाकिस्तानच्या संघर्षाबद्दल बोलत असताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपण पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याची त्यावेळी महत्त्वाची संधी आपण गमावली. दरम्यान भारताने १९४७ मध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सल्ल्याचे पालन केले असते तर २२ मे रोजी जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेला हल्ला तसेच इतर दहशतवादी घटना टाळता आल्या असत्या, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी म्हटले.
(हेही वाचा – कोल्हापुरात राजकीय भूकंप! Rajesh Kshirsagar यांनी काँग्रेसला जोरदार धक्का देत केला ‘हा’ दावा)

आपण या दहशतवाद्यांना त्याचवेळी संपवले असते तर आज वेगळी परिस्थिती असती. जोपर्यंत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर ताब्यात येत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई थांबवली जाऊ नये, अशी सरदार पटेल यांची इच्छा होती. पण त्यांच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही आणि आता ७५ वर्षांनंतरही आपण दहशतवादाचा सामना करत आहोत. पहलगाम हे त्याचेच एक उदाहरण आहे. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

(हेही वाचा – IPL 2025, MS Dhoni : महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीवर चर्चा, ऑन-एअर झाला मोठा वाद)

आपण या दहशतवाद्यांना त्याचवेळी संपवले असते तर आज वेगळी परिस्थिती असती. जोपर्यंत पाकव्याप्त जम्मू-काश्मीर ताब्यात येत नाही, तोपर्यंत लष्करी कारवाई थांबवली जाऊ नये, अशी सरदार पटेल यांची इच्छा होती. पण त्यांच्या बोलण्याकडे कुणीही लक्ष दिले नाही आणि आता ७५ वर्षांनंतरही आपण दहशतवादाचा सामना करत आहोत. पहलगाम हे त्याचेच एक उदाहरण आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.