Sanjay Raut : संजय राऊत ईशान्य मुंबईतून निवडणूक लढणार?

लोकसभा निवडणुकीबाबत केला मोठा खुलासा

90
Sanjay Raut : संजय राऊत ईशान्य मुंबईतून निवडणूक लढणार?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक विधान केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळातून चर्चा सुरु झाली आहे. आगामी निवडणुकांबद्दल पत्रकारांनी संजय राऊत यांना प्रश्न विचारला असता, मी निवडणूकही लढेन असे संजय राऊत यांनी सांगितले.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

ईशान्य मुंबईत साधा शिवसैनिक जरी उभा केला तरी तो निवडून येईल. मला पक्षाने आदेश दिला तर मी तुरुंगातही जातो. जर पक्षाने आदेश दिला तर मी निवडणूकही लढवणार असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. या माध्यमातून त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवण्याचे संकेत दिले.

(हेही वाचा – Diseases of children: लहान मुलांमधील आजारांत वाढ, काळजी घेण्याचे बालरोगतज्ज्ञांचे आवाहन)

आम्ही (Sanjay Raut) बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम करणारे शिवसैनिक आहोत. पक्ष प्रमुखांचा आदेश असेल तर मी काहीही करायला तयार आहे. पक्षाची आवश्यकता असेल तर ईशान्य मुंबईतून निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. या मतदार संघातून एक ते दोन लाख मतांनी शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल. मग पक्षाने संजय राऊतच काय, कोणालाही उभे केले तरी तो उमेदवार विजयी होईल, असा दावाही त्यांनी केला. शिवसेनेच्या मदतीनेच येथे भाजपचा खासदार निवडून आला असल्याचे ते म्हणाले.

पवारांच्या नावामुळे त्यांचे सहकारी निवडून आले

पवारांच्या नावामुळे त्यांचे सहकारी निवडून आले आहेत. तुरुंगातून बाहेर आलेल्या छगन भुजबळ यांनी लगेचच शिवतीर्थावर मंत्रीपदाची शपथ घेतली. हे शरद पवारच करू शकतात. आज राष्ट्रवादीचे नेते खुर्चीवर बसले आहेत, ते शरद पवार यांच्यामुळेच असल्याचा दावा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.