Sanjay Raut Nana Patole : संजय राऊत नौटंकी थांबवा अन् मर्यादा पाळा; नाना पटोलेंनी सुनावले

Lok Sabha Election 2024 : सांगली लोकसभा जागेवरून उबाठा गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यात जोरदार खडाजंगी चालू झाल्याचे पहायला मिळत आहे.

117
Sanjay Raut Nana Patole : संजय राऊत नौटंकी थांबवा अन् मर्यादा पाळा; नाना पटोलेंनी सुनावले
Sanjay Raut Nana Patole : संजय राऊत नौटंकी थांबवा अन् मर्यादा पाळा; नाना पटोलेंनी सुनावले

संजय राऊतांनी मर्यादा पाळावी, त्यांनी आपली नौटंकी बंद करावी, ते ठाकरे गटाचे मोठे नेते आहेत. संजय राऊत यांनी लहान कार्यकर्त्यांसारखे वागू नये, दोन दिवसात सांगलीचा प्रश्न सामोपचाराने सोडवू, असे वक्तव्य काँग्रेसचे (Congress) नेते नाना पटोले यांनी केले आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Seat Sharing) भाजपाविरोधात एकत्र आल्याच्या कितीही वल्गना केल्या जात असल्या, तरी अनेक जागावाटपावरून कार्यकर्ते आणि नेते उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत. उबाठा गटाने मुंबईतील पाच जागा घेतल्याने काँग्रेसमध्ये आधीच नाराजी आहे. त्यात सांगलीत उबाठाने चंद्रहार पाटील यांची उमेदवारी परस्पर जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये खदखद आहे. (Sanjay Raut Nana Patole)

(हेही वाचा – Lok Sabha election 2024 :मतदानासाठी 7 मे रोजी कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी)

संजय राऊत यांनी केले वक्तव्य

यावरून पेच कायम असतांनाच उबाठा नेते संजय राऊत यांनी सांगलीतील सभेत ‘सांगलीत (Sangli Lok Sabha) आमची कोंडी करण्याचा प्रयत्न कराल, तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची कोंडी करू’, असा इशारा दिला. त्यानंतर नाना पटोले यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सुनावले आहे. ‘संजय राऊतांनी नौटंकी थांबवावी, मर्यादा पाळा, लहान कार्यकर्त्यांसारखं वक्तव्य करु नका’, असे पटोले यांनी वक्तव्य केले आहे.

त्यांनी सुधार करावा

नाना पटोले पुढे म्हणाले की, लोकशाही विरोधातील भाजपचं सरकार हे कशाही प्रकारे सत्येत यायला नको, यासाठी आम्ही कोणतेही परिणाम भोगायला तयार आहोत, अशी भूमिका आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे, असं असतानाही लहान कार्यकर्त्यासारखं वक्तव्य करावं हे न पटण्यासारखं आहे, म्हणून त्यांनी त्यामध्ये सुधार करावा. सामंजस्याने मार्ग काढण्याची आमची भूमिका आहे. अशा पद्धतीचे वक्तव्य मोठ्या नेत्याने करु नये.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.