Sanjay Raut : शिंदे – फडणवीस सरकार येत्या तीन महिन्यात पडणार; संजय राऊत यांची भविष्यवाणी

अधिकाऱ्यांनी बेकायदा सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नयेत, आदेश पाळाल तर अडचणीत याल.

158
Sanjay Raut : शिंदे - फडणवीस सरकार येत्या तीन महिन्यात पडणार; संजय राऊत यांची भविष्यवाणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून राज्यात ठाकरे विरुद्ध शिंदे असा  सत्तासंघर्ष सुरु झाला. या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवार ११ मे २०२३ रोजी आपला निर्णय दिला. त्या निर्णयानुसार आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. न्यायालयाच्या या निर्णयावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी हे सरकार तीन महिन्यात जाणार अशी भविष्यवाणी त्यांनी केली आहे.

(हेही वाचा – रस्त्यावर पडणाऱ्या पावसापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार – रवींद्र चव्हाण)

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

राज्यातील हे सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयानं शिंदे-फडणवीसांना उघडं पाडलं आहे. फुटलेला गट हा मूळ पक्षावर दावा करु शकत नाही हे न्यायालयानं सांगितलं आहे. मग तुम्ही कसले पेढे वाटताय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. या सरकारचा मृत्यू अटळ आहे. हे सरकार तीन महिन्यात जाणार असल्याचे राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

हेही पहा – 

तसेच अधिकाऱ्यांनी बेकायदा सरकारचे बेकायदेशीर आदेश पाळू नयेत, आदेश पाळाल तर अडचणीत याल. त्यांचे सर्व आदेश बेकायदेशीर आहेत असे राऊत म्हणाले. आम्ही सत्तेसाठी भुकेलो नाही. उद्धव ठाकरेंनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे. उद्धव ठाकरेंचे काहीही चुकले नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. (Sanjay Raut)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.