उबाठा नेते Sanjay Raut यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकामुळे राज्यातले राजकारण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राऊतांच्या पुस्तकावर खोचक प्रतिक्रिया दिल्यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी सवाल उपस्थित केला आहे. संजय शिरसाट म्हणाले, ज्यांनी मोदी-शाह यांना मदत केला त्यांनी काही बोलले तर त्याला आगळेवेगळे महत्त्व आहे. पण तुम्ही दलाली कशाला करता?, असा सवाल मंत्री शिरसाटांनी Sanjay Raut यांना विचारला आहे.
(हेही वाचा ‘बाल वाड्ःमय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही’; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची खोचक प्रतिक्रिया )
दरम्यान, शिवसेना वाढायला मुंबईत कोण कारणीभूत होते. हे कधीही कुणी सांगितलं नाही. शरद पवार कुणाशी बोलले? पवारांनी विरोध का केला? नरेंद्र मोदींना का वाचवलं? असे सांगतानाच शरद पवार याबाबत बोलले तरच महत्त्व आहे, असेही मंत्री शिरसाट यांनी सांगितले. पण तुम्ही ही दलाली कशाला करता? तुम्हाला हे सर्व कुणी सांगितलं? जर त्यांचं ऐकून तुम्ही हे करत असाल तर त्यांच्या तोंडून येऊ द्या, असेही मंत्री शिरसाट यावेळी म्हणाले.
मंत्री शिरसाट म्हणाले, नाते जपणे हा वेगळा भाग आहे. पण शिवसेनाप्रमुखांनी कधीही राजकारणासाठी नात्याचा वापर केला नाही. शरद पवार शंभर वेळा मातोश्रीला जायचे. त्यांच्या गप्पा व्हायच्या हे शिवसेनाप्रमुख सांगायचे. त्यामुळे त्यांच्यानंतर आता अशा प्रकारे शिवसेनाप्रमुखांचा उल्लेख करणे गैर असल्याचेही मंत्री संजय शिरसाटांनी सांगितले.Sanjay Raut
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मी कादंबऱ्या वाचणे कधीचं सोडलेले आहे, कथा, कादंबऱ्या आणि बालवाड्मय वाचायचं माझं वय राहिलेलं नाही. त्यामुळे असल्या गोष्टी मी वाचत नाही. त्यांचे सोडून द्या, ते खूप मोठे नेते आहेत का, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी माध्यमांना दिली.Sanjay Raut
Join Our WhatsApp Community