भाकरी फिरवली, करपली की वादळात अडकली?

103
भाकरी फिरवली, करपली की वादळात अडकली?
भाकरी फिरवली, करपली की वादळात अडकली?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाच्या पंचविसाव्या वर्धापनदिनी अध्यक्ष शरद पवारांनी खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष नेमून भाकरी फिरवली.सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी पवारांना टिचक्या- टपल्या हाणल्या. इतकेच नाही, तर पवार बलदंड पक्ष पण पक्ष आटोपशीर, असे म्हणत या आटोपशीर पक्षाला दोन कार्यकारी अध्यक्ष नेमायची काय गरज पडली ?, असा खोचक सवालही केला. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सूरज चव्हाण यांनी संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवत “आमच्या भाकरीच सोडा तुमची चूल कोणी पळवली ते आधी पहा” म्हणत संजय राऊतांच सुनावले आहे.

(हेही वाचा – राष्ट्रवादीच्या फेरबदलावरून सामनातून शरद पवार आणि अजित पवारांवर निशाणा)

वाचायला शिका वाचाल तर वाचाल – संजय राऊत

संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते सूरज चव्हाण यांच्यावर भाष्य करताना सल्ला दिला की,इतर सुद्धा वृत्तपत्राचे अग्रलेख आहेत सामनाचा वाचला, सामनाचा अग्रलेख वाचला, असेल तर शेवटपर्यंत वाचा नुसत्या प्रतिक्रिया देऊ नका त्याच्यामध्ये आम्ही शरद पवार यांच्या निर्णयाचा अभिनंदन आणि कौतुक केले आहे. आम्ही आमच्या भूमिका वृत्तपत्रात मांडायच्या नाहीत का? त्याचबरोबर इतर वृत्तपत्राचे अग्रलेख वाचता आले तर ते वाचा,वाचायला शिका वाचाल तर वाचाल असा उपरोधिक टोला देखील लगावला आहे.

यासर्व प्रकरणाकडे पाहिले असता एकमेकांची ऊनी धूनी काढणाऱ्या महाविकास आघाडी ताळमेळ नसल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.