-
प्रतिनिधी
शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी शिवसेना उबाठावर आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेना उबाठाचे राजकीय अस्तित्व संपुष्टात आल्याने त्यांना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गरज भासत आहे, अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना उबाठाने यापूर्वी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेचा पाढा वाचला.
(हेही वाचा – हिंदू नेत्याची निर्घृण हत्या करणाऱ्या Atikur Islam च्या विरोधात ४ दिवसांनंतर गुन्हा दाखल)
निरुपम (Sanjay Nirupam) म्हणाले, “शिवसेना उबाठाने मनसेवर टीका करताना त्यांना ‘भाजपाची बी टीम नव्हे, ढ टीम’ आणि ‘गुनसे म्हणजे गुजरात नवनिर्माण सेना’ असे म्हटले होते. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना ‘भाजपाच्या ताटाखालचे मांजर’ आणि ‘भाडोत्री वक्तव्य करणारे’ असे संबोधले. तसेच, स्वतः पक्ष सोडणाऱ्यांनी गद्दारीवर बोलणे हा विनोद आहे, असे उद्धव यांनी म्हटले होते. आदित्य ठाकरे यांनीही मनसेला ‘संपलेला पक्ष’, ‘टाइमपास पार्टी’ आणि ‘भाजपची बी टीम’ अशी उपमा दिली. संजय राऊत यांनी तर राज ठाकरे यांना ‘भांडुपचा भोंगा’ म्हणत त्यांचे हिंदुत्व ‘नकली’ असल्याची टीका केली होती.”
(हेही वाचा – Anurag Kashyap यांनी मागितली माफी; कारण..)
राऊत यांनी ‘तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय?’ असा सवाल केल्यावर निरुपम (Sanjay Nirupam) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. “माझे आयुष्य महाराष्ट्रात गेले. मी काँग्रेसचा खासदार होतो. पण राऊतांनी कोविड काळात खिचडी घोटाळा केला, त्यांच्या भावाने आणि मुलीच्या नावे कंत्राटे घेतली. गोरेगावात मराठी माणसांना बेघर करून बिल्डर बनून घोटाळे केले. राऊत तुरुंगात गेले. त्यांची ओळख शरद पवार आणि काँग्रेसचे दलाल आणि पैसे खाणारा घोटाळेबाज अशी आहे. त्यांनीच शिवसेना संपवली,” अशी घणाघाती टीका निरुपम यांनी केली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community